एक्स्प्लोर
Advertisement
IRCTC ची वेबसाईट हॅक, कोट्यवधी ग्राहकांचा डेटा चोरी झाल्याची भीती
नवी दिल्ली : आयआरसीटीसीची वेबसाईट हॅक झाली असून अंदाजे एक कोटी ग्राहकांचा पर्सनल डेटा चोरी झाल्याची शक्यता वर्तवली आहे. इतकंच नाही तर वेबसाईट हॅक झाल्याने सुरक्षा आणि प्रायव्हसी भंग होण्याची भीती आहे.
आयआरसीटीसी ही भारताची सर्वात मोठी ई-कॉमर्स वेबासाईट असून यावर दरदिवशी लाखोंचे व्यवहार होता. तसंच याचा डेटा अतिशय महत्त्वाचा आणि गोपनीय आहे. कारण लाखो ग्राहक रिझर्व्हेशन करताना पॅन कार्ड नंबरसह खासगी माहितीही देतात. चोरलेल्या डेटाचा दुरुपयोग केला जाऊ शकतो, त्याद्वारे बनावट डॉक्युमेंट्सही बनवू शकतो, असं एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितलं.
या तपशीलाची किंमत फार जास्त आहे, जो कॉर्पोरेशनला विकला जाऊ शकतो. शिवाय याद्वारे लोकांना टार्गेट करता येऊ शकतं, असं आयआरसीटीच्या सुत्रांनी सांगितलं.
आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत महाराष्ट्र सरकारला अलर्ट केलं आहे. तसंच पोलिसांना याची सूचना दिल्याचं राज्याचे अतिरिक्त गृहसचिव के पी बक्षी यांनी सांगितलं.
सध्या आयआरसीटीसीची वेबसाईट सुरु आहे. मात्र, वेबसाईटवरील डेटा चोरीला गेल्याचं उघडकीस झालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
निवडणूक
भविष्य
निवडणूक
Advertisement