एक्स्प्लोर
Advertisement
UPSC परीक्षेत खळबळ, मुन्नाभाई स्टाईल कॉपी, IPS अधिकारी अटकेत!
या परीक्षेत ‘मुन्नाभाई स्टाईल’ कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे.
चेन्नई: देशातील महत्त्वाच्या परीक्षेपैकी एक असलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी परीक्षेत खळबळजनक घटना घडली आहे.
या परीक्षेत ‘मुन्नाभाई स्टाईल’ कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे हा विद्यार्थी साधासुधा नाही तर चक्क आयपीएस अधिकारी आहे.
साफीर करीम असं या कॉपीबहाद्दर आयपीएस अधिकाऱ्याचं नाव आहे.
साफीर करीम तामीळनाडूत मुख्य परीक्षा देत होता. त्यावेळी त्याला ब्लूटूथद्वारे पत्नीशी संपर्क साधून कॉपी करताना पकडण्यात आलं.
आयपीएस साफीरला आयएएस बनायचं होतं, त्यासाठीच तो ही परीक्षा देत होता.
सध्या साफीर हा तामीळनाडूतील तिरुनेलवेल्ली जिल्हायचा सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. सध्या त्याचा प्रोबेशन पिरीयड सुरु आहे.
परीक्षेत कॉपी करण्यासाठी साफीरने आपल्यासोबत ब्लूटूथ डिव्हाईस ठेवलं होतं. त्याद्वारे तो हैदराबादमध्ये असलेल्या पत्नीशी संपर्क साधत होता. त्याचवेळी त्याला पकडण्यात आलं.
सध्या पोलिसांनी साफीर करीमसह त्याच्या पत्नीलाही ताब्यात घेतलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement