Iron Man | IPS कृष्ण प्रकाश यांचं नाव आता 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये, जिंकला आयर्नमॅनचा पुरस्कार
पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त IPS कृष्ण प्रकाश (Krishna Prakash) यांच्या नावाची नोंद आता 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड' (World Book of Record) मध्ये करण्यात आली आहे. त्यांनी 2017 साली 'आयर्नमॅन ट्रायथलॉन रेस' ही जगातील सर्वात आव्हानात्मक स्पर्धा जिंकली होती. (Iron man)
मुंबई: पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त IPS कृष्ण प्रकाश यांच्या नावाची नोंद आता 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये करण्यात आली आहे. त्यांनी 2017 साली जगातली सर्वात आव्हानात्मक समजली जाणारी 'आयर्नमॅन ट्रायथलॉन रेस' ही स्पर्धा जिंकली होती. अशी कामगिरी करणारे ते भारतातील पहिलेच पोलीस अधिकारी आहेत. या आधी भारतीय सैन्य, निमलष्करी दल किंवा पोलीस सेवेतील कोणत्याही अधिकाऱ्याला ही कामगिरी पार पाडता आली नव्हती.
पिंपरी चिंचवडमध्ये टोळक्याचा तुफान राडा, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासमोर गुन्हेगारांचं आव्हान
कृष्णप्रकाश यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन ही माहिती दिली. अशा प्रकारचे ते भारतातील पहिलेच वर्दीधारक अधिकारी असल्याने तशा प्रकारचे प्रमाणपत्रक कृष्णप्रकाश यांना देण्यात आले. त्याचे फोटो कृष्णप्रकाश यांनी बुधवारी आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरुन शेअर केले. कृष्ण प्रकाश यांनी हा सन्मान देशाला, पोलीस दलातील आपल्या सहकाऱ्यांना, कुटुंबाला आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या सर्वांना अर्पण केल्याचं सोशल मीडियाच्या पोस्टमधून सांगितलंय.
Honoured to become a part of 'World Book of Record Holders' for being the first Indian Government Servant, Civil Servant and Uniformed Services Officer including Armed Forces and Para Military Forces to earn the Iron Man title! ???????????????? Jai Hind ????????????#IronMan #WednesdayMotivation pic.twitter.com/ytk7MvxPRv
— Krishna Prakash (@Krishnapips) January 20, 2021
Maharashtra DGP | हेमंत नगराळे महाराष्ट्र पोलिसांचे नवे बॉस, राज्याच्या पोलीस महासंचालकपदी वर्णी
काय आहे आयर्नमॅन ट्रायथलॉन रेस? फ्रान्समधील आयर्नमॅन ट्रायथलॉन रेस ही स्पर्धा अत्यंत खडतर अशी समजली जाते. यामध्ये 4 किलोमीटर पोहणे, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42 किलोमीटर धावणे असे प्रकार केवळ 16 तासात पूर्ण करायचे असतात. ते खेळाडूंसाठी एक प्रकारचं आव्हान असल्याचं समजलं जातं. त्यासाठी जगातील अनेक खेळाडू मेहनत घेतात. पण खूप कमी लोक ही स्पर्धा पूर्ण करु शकतात. ही स्पर्धा जिंकण्यासाठी कृष्णप्रकाश यांनी प्रचंड मेहनत घेतली होती.
पोलीस दलातील एक डॅशिंग अधिकारी अशी ओळख कृष्णप्रकाश यांची आहे. त्यांची पोस्टिंग ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात ते यशस्वी होतात. कृष्णप्रकाश यांच्या या कामगिरीमुळे त्यांचे देशभरातून कौतुक होत आहे.