एक्स्प्लोर

INX Media Case | चिदंबरम यांना आज कोर्टात हजर करणार, सीबीआय कोठडी मागणार

सीबीआयच्या पथकाला पी. चिदंबरम यांच्या घराच्या प्रवेशद्वारावरुन (गेवटवरुन), भिंतीवरुन उड्या मारुन घरात प्रवेश करावा लागला. त्यानंतर सीबीआयच्या टीमने चिदंबरम यांना ताब्यात घेतलं. रात्री 10.15 वाजता चिदंबरम यांना अटक झाली.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत बुधवारी (21 ऑगस्ट) रात्री घडलेल्या हायव्होल्टेज ड्राम्यानंतर देशाचे माजी गृह आणि अर्थमंत्री पी.चिदंबरम यांना अटक करण्यात आली. सीबीआय मुख्यालयात रात्रभर चौकशी केल्यानंतर, आज (22 ऑगस्ट) दुपारी दोन वाजता त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. सीबीआय 14 दिवसांची कोठडी मागणार आहे. आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी पी.चिदंबरम यांना अटक करण्यात आली. तब्बल दोन तासांच्या हायव्होल्टेज ड्राम्यानंतर सीबीआयने त्यांना बेड्या ठोकल्या. यावेळी चिदंबरम यांच्या घराबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठा राडा केला. परिणामी सीबीआयने दिल्ली पोलिसांना घटनास्थळी पाचारण केलं. दिल्ली पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केल्यानंतर सीबीआयने चिदंबरम यांना अटक केली आहे. दोन तासांच्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर पी. चिदंबरम यांना अटक, राडा करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड आयएनएक्स मीडिया घोटाळाप्रकरणी सीबीआयच्या रडारवर असलेले पी. चिदंबरम गेल्या 27 तासांपासून बेपत्ता होते. ते थेट काल रात्री माध्यमांसमोर आले. त्यांनी रात्री 8.15 वाजता नवी दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. अवघ्या सहा मिनिटे चाललेल्या या पत्रकार परिषदेत चिदंबरम यांनी त्यांच्यावर असलेल्या आरोपांचं खंडन केलं. चिदंबरम माध्यमांसमोर येताच सीबीआयचं पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस मुख्यालयात पोहोचलं. परंतु चिदंबरम सीबीआयच्या हाती लागले नाहीत. उलट ते घरी पळाले. सीबीआयसोबतच ईडीची टीम चिदंबरम यांच्या निवासस्थानी पोहोचली. परंतु सीबीआयला चिदंबरम यांच्या घरात जाण्याची परवानगी मिळाली नाही. परिणामी सीबीआयच्या पथकाला चिदंबरम यांच्या घराच्या प्रवेशद्वारावरुन (गेवटवरुन), भिंतीवरुन उड्या मारुन घरात प्रवेश करावा लागला. त्यानंतर सीबीआयच्या टीमने चिदंबरम यांना ताब्यात घेतलं. रात्री 10.15 वाजता चिदंबरम यांना अटक झाली. चिदंबरम यांच्या घराबाहेर हायव्होल्टेज ड्रामा, गेटवरुन उड्या मारुन सीबीआय पथक घरात चिदंबरम यांनी त्यांच्या घराचा दरवाजा न उघडल्याने सीबीआयने अक्षरशः कसरत करुन निवासस्थानाच्या गेटवर चढून निवासस्थानी प्रवेश केला. दरम्यान यामुळे निवासस्थानाबाहेर परिस्थिती चिघळली होती. चिदंबरम यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते जमा झाले होते. काँग्रेस कार्यकर्ते सीबीआय आणि ईडीच्या कारवाईत अडथळा आणत होते. कार्यकर्त्यांनी राडा सुरु केल्यानंतर सीबीआयने दिल्ली पोलिसांकडे मदत मागितली. दिल्ली पोलिसांनी या राडा करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड केली. काय आहे प्रकरण? UPA-1 सरकारच्या काळात तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या काळात एफआयपीबीने दोन प्रकल्पांना मंजुरी दिली होती. अर्थमंत्री असताना चिदंबरम यांच्या कार्यकाळात 2007 मध्ये 305 कोटी रुपयांचं परदेशी चलन मिळवण्यासाठी आयएनएक्स मीडिया समूहला दिलेल्या एफआयपीबी मंजुरीत अनियमितता झाली आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणात सीबीआयने 15 मे 2017 रोजी प्राथमिक गुन्ह्याची नोंद केली होती. तर ईडीने मागील वर्षी या संबंधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंदवला होता. 27 तासांनंतर पी. चिदंबरम माध्यमांसमोर, म्हणाले माझ्यावरील आरोप खोटे ज्या दोन कंपन्यांमध्ये रक्कम ट्रान्सफर केली होती, त्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांच्या आहेत. त्यामुळे कार्ती यांच्या हस्तक्षेपानंतर आयएनएक्स मीडियाला एफआयपीबी मंजुरी देण्यात आली असावी, असा दावा ईडीने केला आहे. तसंच एफआयपीबीच्या मंजुरीसाठी आयएनएक्स मीडियाचे पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांनी पी. चिदंबरम यांची भेट घेतली होती, जेणेकरुन वाटपात कोणताही विलंब होऊ नये, असं ईडीच्या तपासात आतापर्यंत समोर आलं आहे. या प्रकरणात सीबीआयने त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना 28 फेब्रुवारी 2018 रोजी अटक केली होती, जे सध्या जामीनावर बाहेर आहेत. 2007 मध्ये आयएनएक्स मीडियाला एफआयपीबी मंजुरी मिळवून देण्यासाठी कथितरित्या लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. INX Media Case | पी चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडूनही दिलासा नाही हाईकोर्टने 25 जुलै 2018 रोजी चिदंबरम यांना दोन्ही प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळाला होता, जो वेळोवेळा वाढवला होता. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी (20 ऑगस्ट) अटकपूर्व जामीन फेटाळला होता. मात्र चिदंबरम यांनी या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. बुधवारी सकाळी सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती एन व्ही रमना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने अटकेपासून दिलासा देण्यास नकार देत, त्यांची याचिका तात्काळ सुनावणीसाठी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याकडे पाठवली. तपास यंत्रणांनी चिदंबरम यांच्या जामीन अर्जाचा विरोध करत म्हटलं की, तपासासाठी त्यांना ताब्यात घेणं गरजेचं आहे. कारण चौकशीत चुकीची माहिती दिली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारीEknath Shinde Koregaon Sabha : महेश शिंदेंच्या प्रचारसाठी कोरेगावात सभा, शिंदेंची कोरेगावात सभाSharad Pawar On Retirement : 14 वेळा निवडणुका लढल्या, आता निवडणुक लढणार नाहीमध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनातील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनातील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Embed widget