(Source: ECI/ABP News/ABP Majha)
INS Arihant : भारताचं मोठं पाऊल, INS अरिहंतवरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी
India Fires Ballistic Missile : संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारताने आण्विक पाणबुडी INS अरिहंतवरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे.
India Nuclear Ballistic Missile Test : भारताने आण्विक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची (Nuclear Capable Ballistic Missile) यशस्वी चाचणी केली आहे. हे भारतासाठी एक महत्त्वाचं आणि मोठं पाऊल आहे. संरक्षण मंत्रालयाने माहिती दिली आहे की, भारताने आण्विक पाणबुडी INS अरिहंतवरून (INS Arihant) बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची (Ballistic Missile) यशस्वी चाचणी (India Fires Ballistic Missile) केली आहे. संरक्षण मंत्रालयाने पुढे म्हटलं आहे की, अनेक देशांकडून बॅलेस्टिक (Ballistic Missile) आणि आण्विक क्षेपणास्त्रांची (Nuclear Missile) चाचणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्यासाठी योग्य तयारी असणे आवश्यक आहे. त्यामुळे भारताचं हे पाऊल फार महत्त्वाचं आहे.
2009 पासून INS अरिहंत नौदलाच्या सेवेत
भारताने 14 ऑक्टोबर रोजी बॅलेस्टिक मिसाईल टेस्ट (Ballistic Missile Test) केली, जी यशस्वी ठरली. विशेष म्हणजे INS अरिहंतवरून (INS Arihant) चाचणी करण्यात आलेल्या क्षेपणास्त्राची पहिल्यांदाच संरक्षण मंत्रालयाने अधिकृत माहिती दिली आहे. INS अरिहंत 2009 मध्ये लाँच करण्यात आली होती. त्यानंतर 2016 मध्ये INS अरिहंत नौदलाच्या सेवेत रुजू झाली. मात्र INS अरिहंतच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात कोणत्याही चाचणीची माहिती देण्यात आली नव्हती. INS अरिहंतबाबत नौदलाने नेहमीच गोपनियता बाळगली आहे.
INS अरिहंत भारतीय नौदलातील एकमेव आण्विक पाणबुडी
INS अरिहंत भारतीय नौदलातील एकमेव न्यूक्लिअर बॅलेस्टिक सबमरीन (SSBN) म्हणजे आण्विक पाणबुडी आहे. INS अरिहंत भारतीय नौदलातील एकमेव आण्विक बॅलेस्टिक पाणबुडी 2009 मध्ये लाँच करण्यात आली. त्यानंतर नौदलाने या पाणबुडीला 2016 साली कोणताही गाजावाजा न करता नौदलात सामील करुन घेतलं. INS अरिहंत लाँच करण्यात आली तेव्हा या पाणबुडीचा फोटो समोर आला होता. मात्र त्यानंतर याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. शुक्रवारी झालेल्या क्षेपणास्त्र चाचणीचे फोटो किंवा व्हिडीओ लवकरच प्रसिद्ध करण्यात येण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या आण्विक पाणबुडीवर काम सुरु
INS अरहिंट व्यतिरिक्त भारत आता दुसरी आण्विक पाणबुडी (SSBN) INS अरिघाटवर देखील काम सुरु आहे, मात्र याबद्द्ल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. INS अरिहंतपूर्वी, भारताकडे दुसरी आण्विक पाणबुडी INS चक्र होती, जी रशियाकडून 10 वर्षांसाठी भाड्याने घेतली गेली होती. पण ती अणुऊर्जेवर चालणारी (SSN) पाणबुडी होती, पण या पाणबुडीवरून आण्विक-बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने डागता आलं नाही.