इन्फोसिस फाउंडेशनकडून आरोहण सोशल इनोव्हेशन पुरस्कारांची घोषणा, 8 संशोधकांना 2 कोटी रुपयांचे पारितोषिक
इन्फोसिसची सामाजिक कार्य सीएसआर शाखा असलेल्या इन्फोसिस फाउंडेशनने आज आरोहण सोशल इनोव्हेशन अवॉर्ड्सच्या चौथ्या आवृत्तीच्या विजेत्यांची घोषणा केली.
Infosys Foundation : इन्फोसिसची सामाजिक कार्य सीएसआर शाखा असलेल्या इन्फोसिस फाउंडेशनने आज आरोहण सोशल इनोव्हेशन अवॉर्ड्सच्या चौथ्या आवृत्तीच्या विजेत्यांची घोषणा केली. या पुरस्कारांची सुरूवात 2018 मध्ये झाली आणि त्यातून भारतातील जीवन सुधारण्यासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी व सामाजिक कल्याणासाठी अभूतपूर्व उपाय विकसित करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करून पारितोषिक दिले जाते.
यंदा शिक्षण, आरोग्यसेवा आणि पर्यावरणीय शाश्वतता या तीन क्षेत्रांमध्ये अपवादात्मक नवसंशोधनांचा गौरव करण्यात आला. तंत्रज्ञान, सर्जनशीलता आणि करुणेद्वारे सामाजिक प्रेरणा देण्याच्या इन्फोसिस फाउंडेशनच्या ध्येयाशी जुळणारी ही तीन क्षेत्रे आहेत. या वेळी 2000 हून अधिक प्रवेशिकांमधून विजेत्यांची निवड प्रतिष्ठित परीक्षक मंडळाने केली. त्यात यांचा समावेश होता:
श्री. अभिजित रे, सह-संस्थापक, युनिटस कॅपिटल आणि यूसी इनक्लुझिव्ह क्रेडिट
श्रीमती अलिना आलम, संस्थापक, एमआयटीटीआय कॅफे
श्रीमती अपर्णा उप्पलुरी, संस्थापक आणि प्रमुख सल्लागार, अंतरा एडव्हायझरी
श्री. सुमित वीरमणी, विश्वस्त, इन्फोसिस फाउंडेशन
श्री. सुनील कुमार धारेश्वर, विश्वस्त, इन्फोसिस फाउंडेशन
आरोहण सोशल इनोव्हेशन एवॉर्ड्स 2025 चे विजेते खालीलप्रमाणे आहेत. त्यातील प्रत्येकाला त्यांच्या प्रभावी नवसंशोधनासाठी प्रत्येकी 50 लाख रूपये दिले जातील:
शिक्षण
बंगळुरु येथील राजेश ए राव, रवींद्र एस राव आणि दीपा एल बी राजीव यांनी 'कनेक्टिंग द डॉट्स' हा एक परस्परसंवादी शिक्षण कार्यक्रम विकसित केला आहे. त्यातून सरकारी शाळांमधील इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दररोज लाईव्ह वर्ग, लॅब किट, शिष्यवृत्ती आणि प्रभावी शिक्षणासाठी शिक्षक प्रशिक्षणाद्वारे स्टेम आणि स्पोकन इंग्लिश शिकवले जाईल.
आरोग्यसेवा
नवी दिल्ली येथील चितरंजन सिंह आणि रॉबिन सिंह यांनी 'क्लुइक्स सीओ१२' विकसित केला आहे. तो पोर्टेबल एआय- आणि आयओटी-सक्षम पाणी-गुणवत्ता विश्लेषक असून त्यातून रिअल-टाइम, जीपीएस-टॅग केलेले अहवाल तयार करतो. ते 30 मिनिटांत पाण्यामुळे होणारे रोग ओळखण्यासाठी १४ प्रमुख पॅरामीटर्सची चाचणी करते. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण दोन्ही वर्गांत विश्वसनीय जल चाचणी परवडणारी, सुलभ आणि शाश्वत बनते.
पर्यावरणीय शाश्वतता
पुण्यातील राहुल सुरेश बाकरे आणि विनित मोरेश्वर फडणीस यांनी 'बोरचार्जर' विकसित केले. हे जगातील पहिले रोबोटिक कृत्रिम बोअरवेल-रिचार्ज तंत्र असून ते दरवर्षी 4 ते 80 लाख लिटर पावसाचे पाणी विद्यमान बोअरवेलमध्ये साठवू शकते. त्यामुळे सिंचन, शेती उत्पादन आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता आणि प्रमाण सुधारते – राहणीमान अधिक शाश्वत बनवते.
इन्फोसिस फाउंडेशनचे अध्यक्ष सलील पारेख म्हणाले, “एका विशिष्ट उद्देशाने केलेल्या नवसंशोधनात जीवन बदलण्याची आणि शाश्वत भविष्य घडवण्याची शक्ती असते. आरोहण सोशल इनोव्हेशन अवॉर्ड्स या विश्वासाचे प्रतीक आहेत. ते अशा व्यक्तींचा गौरव करतात ज्यांनी आव्हानांना संधींमध्ये रूपांतरित केले आहे आणि बुद्धिमत्ता, सहानुभूती आणि प्रभाव साध्य केला आहे. शिक्षण, आरोग्यसेवा आणि पर्यावरणीय शाश्वततेत अभूतपूर्व काम करताना इन्फोसिस फाउंडेशनमध्ये आम्ही अशा नवसंशोधनाचा प्रभाव वाढवण्याचे आणि समतापूर्ण आणि लवचिक भविष्य घडवण्यासाठी वचनबद्ध असलेल्या संशोधकांच्या पिढीला प्रेरणा देण्याचे उद्दिष्ट ठेवतो.
श्रेणीतील विजेत्यांव्यतिरिक्त परीक्षक मंडळाने पाच सामाजिक नवसंशोधनांचा गौरव केला आणि त्यांच्या निर्मात्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये बक्षीस दिले. ज्युरीचे विशेष पुरस्कार विजेती नवसंशोधने आहेत:
•सुकून - डिजिटल हायब्रिड-आयडीईसी यंत्रणेवर आधारित एक स्मार्ट जॅकेट जे वापरकर्त्यांना प्रचंड उष्णतेच्या थंडावा देते जेणेकरून आरोग्य सुधारेल आणि उत्पादकता वाढेल. हे पुण्यातील फाल्गुन मुकेश व्यास यांनी विकसित केले आहे.
•व्यापक वन्यजीव व्यवस्थापन प्लॅटफॉर्म - एक वेब-आधारित प्लॅटफॉर्म असून वन्यजीव बचाव, उपचार, पुनर्वसन आणि मुक्ततेवरील डेटा रेकॉर्ड आणि व्यवस्थापित करतो. तो प्राणी, मानव आणि पर्यावरणीय आरोग्याला जोडण्यासाठी, प्रशासन, देखरेख आणि धोक्याचे मूल्यांकन करण्यास उपयुक्त ठरतो. त्यासाठी तो वन हेल्थ फ्रेमवर्क वापरतो. त्याचा विकास पुण्यातील नेहा पंचमिया आणि नचिकेत उत्पात यांनी केला आहे.
•प्रोजेक्ट बिंदू - अपंग व्यक्तींसाठी (पीडब्ल्यूडी) दूरस्थ, तंत्रज्ञान-सक्षम कार्य वातावरणनिर्मिती करणारा एक उपक्रम, जो वृद्धसेवा, बॅकएंड पाठबळ, डेटा हाताळणी आणि समन्वय देतो. त्यामुळे पीडब्ल्यूडींना आर्थिक स्वातंत्र्य आणि समावेश साध्य करता येतो. त्याचा विकास पुण्यातील सौम्या एस आणि पल्लवी कुलकर्णी यांनी केला आहे.
•सर्व्हिचेक- वडोदरा येथील अनिर्बान पालित, डॉ. सायंतनी प्रामाणिक आणि पलना पटेल यांनी विकसित केलेले एचपीव्ही (ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस) स्क्रीनिंगसाठी भारतातील पहिले सीडीएससीओ -मंजूर घरगुती स्वयं-नमुना किट.
•हेक्सिस आणि आयरिस - दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी भारतातील एकमेव एकात्मिक शिक्षण परिसंस्था, ज्यात एक अद्वितीय रिफ्रेशेबल ब्रेल डिस्प्ले, एक स्पर्शाकृती एक्सप्लोरर आणि शिक्षकांसाठी साहित्याचा प्लॅटफॉर्म एकत्र आणला गेला आहे. तो के-१२ विशेष शाळा आणि समावेशक वर्गखोल्यांसाठी प्रगत वाचन आणि स्टेम शिक्षण सक्षम करतो. बंगळुरू येथील नागराजन राजगोपाल, विद्या वाय आणि सुप्रिया डे यांनी तो विकसित केला आहे.
इन्फोसिस फाउंडेशनचे विश्वस्त सुमित वीरमणी म्हणाले, “सामान्य लोक असाधारण गोष्टी करू शकतात या विश्वासाने आरोहण सोशल इनोव्हेशन अवॉर्ड्स दिले जातात. यंदाच्या विजेत्यांचे समर्पण आणि कल्पनाशक्ती नवसंशोधनासोबत करूणा जोडली जाते तेव्हा बरेच काही शक्य आहे असे दाखवते. शाश्वत, सामाजिक उपाययोजना देण्याच्या त्यांच्या संकल्पाने आम्हाला प्रेरणा मिळाली आहे आणि आशा आहे की त्यांचे प्रयत्न देशभरात सकारात्मक बदल घडवत राहतील.”
आरोहण सोशल इनोव्हेशन अवॉर्ड्स आणि या वर्षीच्या विजेत्यांबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया येथे भेट द्या: www.infosys.com/aarohan
























