एक्स्प्लोर

Mukesh Ambani: इकडे सगळ्यांचं लक्ष PM मोदी अन् टीम इंडियाच्या भेटीकडे, तिकडे मुकेश अंबानी दिल्लीत सोनिया गांधी, राहुल गांधींना भेटले

Ambani Meets Gandhi in Delhi: दिल्लीत पंतप्रधान मोदी यांनी टीम इंडियाच्या खेळाडुंची भेट घेतली. या भेटीची सकाळपासून चर्चा होती. मात्र, दिल्लीतील आणखी एक महत्त्वाची भेट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

नवी दिल्ली: आज सकाळपासून अवघ्या देशाचे लक्ष भारतात आगमन झालेल्या विश्वविजेत्या टीम इंडियाकडे लागले आहे. काल संध्याकाळी बार्बाडोसवरुन विशेष विमानाने निघालेला भारतीय संघ शुक्रवारी सकाळी दिल्लीत पोहोचला. यानंतर भारतीय संघाने दिल्लीतील 7 लोककल्याण मार्ग येथे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची भेट घेतली. ही भेट आटोपून भारतीय संघ आता मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. आता मुंबईत ओपन डेक बसमधून टीम इंडियाची (Team India) विजययात्रा काढण्यात येणार आहे. त्यामुळे आज सकाळपासून ते इथून पुढचे काही तास तमाम देशवासियांचे लक्ष टीम इंडियावर खिळून असेल.

मात्र, या सगळ्यात दिल्लीत घडलेली एक घडामोड अनेकांच्या लक्षात आली नाही. एरवी अंबानी परिवार हा सामान्य जनता आणि प्रसारमाध्यमांसाठी नेहमीच कुतूहलाचा विषय ठरतो. मात्र, शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे दिल्लीत आले होते तरी बराचकाळ कोणाला त्याचा पत्ता नव्हता. मुकेश अंबानी यांनी दिल्लीत येऊन काँग्रेस पक्षाच्या संसदीय मंडळाच्या अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेतली. सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील 10 जनपथ या निवासस्थानी मुकेश अंबानी आले होते. यावेळी संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधीही त्याठिकाणी उपस्थित असल्याचे कळते. मात्र, दिल्लीत टीम इंडियाचा कौतुक सोहळा आणि त्यानंतर भारतीय संघाची पंतप्रधान मोदींसोबतची भेट या सर्व गदारोळात मुकेश अंबानी दिल्लीत असल्याची माहिती बराचवेळ समोर आली नव्हती.

अखेर काहीवेळापूर्वी मुकेश अंबानी यांची गाडी सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील 10 जनपथ निवासस्थानावरुन बाहेर पडताना दिसल्यानंतर सगळ्यांना या भेटीबद्दल कळाले. मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याचे येत्या 12 जुलैला लग्न आहे. याच विवाहसोहळ्याचे सोनिया गांधी यांना निमंत्रण देण्यासाठी मुकेश अंबानी दिल्लीत आले होते. मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी या आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या संघाचे मालक आहेत. रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह हे मुंबई इंडियन्सच्या संघातून खेळतात.

अनंत-राधिकाच्या लग्नात जस्टीन बीबरचा परफॉमर्न्स

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा प्रचंड चर्चेचा विषय ठरला होता. यावेळी पॉपस्टार रिहानाने परफॉर्म केले होते. त्यानंतर आता अनंत अंबानीच्या लग्नात जागतिक ख्यातीचा गायक जस्टिन बीबर परफॉर्म करणार असल्याची माहिती समोर आली आहे. जस्टिन बीबर मुंबईत दाखल झाला आहे. 

आणखी वाचा

Team India: नमो, जर्सी नंबर 1... टीम इंडियाने पंतप्रधान मोदींना दिलेली जर्सी पाहिलीत का?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारीEknath Shinde Koregaon Sabha : महेश शिंदेंच्या प्रचारसाठी कोरेगावात सभा, शिंदेंची कोरेगावात सभाSharad Pawar On Retirement : 14 वेळा निवडणुका लढल्या, आता निवडणुक लढणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनातील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनातील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Embed widget