Indore Honeymoon Couple: राजा सोनम रघुवंशी यांच्या लग्नाचा व्हिडिओ आला समोर, फोटोंमध्ये तीच्या तोंडावरचा आनंद उडालेला, मास्टरमाइंड निघाला तिच्याच जवळचा!
Indore Honeymoon Couple: सोनम उत्तर प्रदेशात सापडल्यानंतर, मेघालयात 17 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या जोडप्याच्या बाबतीत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. अलिकडेच त्यांच्या लग्नाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये सोनम आनंदी दिसत नाहीये.

Sonam Raghuvanshi Raja Raghuvanshi Wedding Video: इंदौरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मेघालय पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. मध्य प्रदेशातील 3 हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. सोनमने यूपीतील गाजीपूरमध्ये आत्मसमर्पण केले आहे. हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. सोनमला अटक करण्यात आली आहे आणि इंदौर पोलिस गाझीपूरला रवाना झाले आहेत. संपूर्ण प्रकरणाची माहिती घेण्यासाठी सोनमने स्वतः तिच्या घरी फोन केला. या हत्येत राजा रघुवंशी यांची पत्नी सोनम रघुवंशी यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. मेघालयात 17 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या जोडप्याच्या प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. सोनम रघुवंशी ही यूपीतील गाजीपूरमध्ये पोलिसांना सापडल्यापासून आतापर्यंत झालेले खुलासे धक्कादायक आहेत. दरम्यान, आता सोनम आणि राजा रघुवंशी यांच्या लग्नाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती अजिबात आनंदी दिसत नाहीये, त्यामुळे ती या लग्नामुळे आंनदी नव्हती का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सोनम आणि राजा रघुवंशी यांच्या लग्नाचा हा व्हिडिओ
सोनम आणि राजा रघुवंशी यांच्या लग्नाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोनम आणि राजा बेपत्ता झाल्यावर लोक सहानुभूती व्यक्त करण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करत होते, पण आता लोक या व्हिडिओमधील सोनम आणि राजाच्या हावभावांकडे लक्ष देत आहेत. काही लोक म्हणतात की व्हिडिओमध्ये राजा रघुवंशी आनंदी दिसत आहेत, परंतु सोनमच्या चेहऱ्यावर ती आनंदी नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते, उलट तिच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नाहीत.
राजा आणि सोनम यांचे लग्न 11 मे रोजी झाले होते. त्यानंतर दोघेही हनिमूनसाठी मेघालयातील शिलाँगला गेले. 23 मे रोजी दोघेही अचानक बेपत्ता झाले आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्याबद्दल काहीही माहिती मिळाली नाही. यानंतर, राजा आणि सोनमचे कुटुंबीय खासदार आणि मेघालय सरकारकडे त्यांच्या मुलांना शोधून परत आणण्याची मागणी करत राहिले. 2 जून रोजी राजाचा मृतदेह सापडल्यानंतर त्याचे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. राजा रघुवंशी यांच्या कुटुंबाने तेव्हाही आरोप केला होता की त्यांची सून सोनम देखील त्यांच्या मुलाच्या हत्येत सहभागी होती. पोलिस या दृष्टिकोनातून तपास करत नव्हते कारण शिलाँगचा तो भाग जिथे हे दोघे गायब झाले होते, तो फारसा सुरक्षित परिसर नव्हता.
पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, सोनम रघुवंशीचे राज कुशवाहा नावाच्या व्यक्तीसोबत आधीपासून प्रेमसंबंध होते आणि त्यानेच या हत्येचा कट रचला होता. पोलिसांच्या तपासात समोर आले आहे की, राज कुशवाहा हा मध्य प्रदेशचाच रहिवासी आहे. राज या हत्याकांडाचा मास्टरमाइंड आहे. त्यानेच सोनमसोबत मिळून मध्य प्रदेशातील तीन जणांना राजा रघुवंशीच्या हत्येची सुपारी दिली होती. या सर्वांनी मिळून मेघालयमध्ये हनिमून दरम्यान राजाची हत्या केली. त्यानंतर सोनम तिचा प्रियकर राज कुशवाहा सोबत पळून गेली. सोनम आणि राज हे दोघे उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे पोहोचले, त्याठिकाणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
ये सोनम और राजा रघुवंशी की शादी का वीडियो है,
— ANIL (@AnilYadavmedia1) June 9, 2025
गुस्सा सोनम के चेहरे पर साफ़ दिख रहा है,
जबकि राजा रघुवंशी प्रसन्न है,
उसे क्या मालूम कि वो अपनी अर्धांगिनी की मांग में सिंदूर नहीं भर रहा है,
बल्कि अपनी मौत को तिलक लगा रहा है,
अरे दुष्टा शादी से खुश ना थी,
तो प्रेमी के साथ भाग… pic.twitter.com/RiFRwRRnub























