Gujarat : उत्सवाच्या वेळी किंवा जत्रेवेळी मंदिरं सजवली जातात. वेगवेगळ्या लाइट्सच्या माळांनी किंवा फुलांनी सजवलेलं मंदिर तुम्ही पाहिलं असेल. पण वरदायिनी देवीचं मंदिर हे चक्क डॉलरनं सजवण्यात आलं आहे. गांधीनगरमधील ( gandhinagar ) रूपल गावमध्ये असणारे वरदायिनी देवीचे मंदिर काल (बुधवार) 1500 डॉलरनं सजवण्यात आलं आहे. अमेरिकेहून एका भक्तानं या नोटा पाठवल्या आहेत. दरवर्षी वरदायिनी देवीचे मंदिर वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करून सजवण्यात येतं. पण या वर्षी हे मंदिर डॉलरनं सजवण्यात आलं आहे. मोठ्या संख्येनं भाविक देवीच्या दर्शनाला येत आहेत. रूपल गावातील या वरदायिनी देवीच्या मंदिर हे ऐतिहासिक आहे. या मंदिरासोबत अनेक रंजक कथा जोडल्या गेल्या आहेत.
रुपल गावात पाच हजार वर्षांपासून माता पल्लीची जत्रा भरते. रुपल गावातील वरदायिनी मातेची कथा पांडवांशी निगडीत आहे.असे म्हटले जाते की, पांडव वनवासात असताना येथेच राहिले होते. पांडवांनी शस्त्रे लपवण्यासाठी वरदायिनी देवीला बोलावले होते. तुपाचा अभिषेक केल्यावर एक वरदायिनी देवी प्रकट झाली आणि तिने पांडवांना वरदान दिले.
हस्तिनापूरचे युद्ध जिंकल्यानंतर पांडव पुन्हा कृष्णासोबत येथे आले. त्यानंतर सोन्याची पल्ली तयार करून यात्राचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर दरवर्षी नऊरात्रीमध्ये वरदायिनी माता पल्लीच्या यात्रेचे आयोजन केलं जातं. या यात्रेला भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित असतात.
महत्वाच्या बातम्या
- Infosys Recruitment : मोठी संधी! इन्फोसिसमध्ये होणार 55 हजार जणांची नोकर भरती, सीईओ सलील पारेख यांची माहिती
- High Court: दहा वकिलांना मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी बढती, सर्वोच्च न्यायालयाच्या कोलॅजिअमची शिफारस
Dr. Michiaki Takahashi: चिकनपॉक्सवरील लस शोधणारे डॉ. मिचियाकी यांची जयंती; गुगलकडून अनोखं अभिवादन
- LIC IPO : एलआयसी विमाधारकांसाठी महत्त्वाची बातमी, LIC IPO अर्ज करण्याआधी 'हे' काम कराच
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha