Rakesh Gangwal : इंडिगो एअरलाइन्स (IndiGo Airline) चे सह-संस्थापक राकेश गंगवाल (Rakesh Gangwal) यांनी कानपूर(Kanpur)च्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) कानपूरला 100 कोटींची देणगी दिली आहे. ही रक्कम स्कूल ऑफ मेडिकल सायन्स टेक्नॉलॉजीच्या विकासासाठी वापरण्यात येणार आहे. सोमवारी (4 एप्रिल) मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये ही रक्कम आयआयटी कानपूरला देण्यात आली. राकेश हे आयआयटी कानपूरचे माझी विद्यार्थी आहेत. ही रक्कम संस्थेच्या इतिहासातील माजी विद्यार्थ्याने दिलेली सर्वात मोठी आर्थिक मदत मानली जात आहे.
कोलकाता येथील रहिवासी असलेले राकेश गंगवाल यांनी कोलकाता येथील डॅन बास्को स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले. त्यांनी 1975 मध्ये आयआयटी कानपूरमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. बीटेक केल्यानंतर पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूलमधून एमबीए पूर्ण केल्यानंतर ते अमेरिकेत स्थायिक झाले. त्यानंतर त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले. राकेश गंगवाल सप्टेंबर 1980 मध्ये एअरलाइन उद्योगात रुजू झाले.
आयआयटीचे संचालक प्रा. अभय करंदीकर म्हणाले की, राकेश गंगवाल यांच्या आर्थिक मदतीमुळे आणि सामंजस्य करारामधून संस्थेत स्थापन होत असलेल्या स्कूल ऑफ मेडिकल रिसर्च अँड टेक्नॉलॉजीच्या सुधारणेसाठी, संशोधन कार्याच्या चालना मिळण्यास मदत होईल. मुंबईमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये राकेश गंगवाल यांच्या सोबतच त्यांची पत्नी शोभा, मुलगा पारूल आणि आयआयटीचे उपसंचालक प्रा. एस गणेश, आयआयटी डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे सीईओ कपिल कौल, प्रा. कांतेश बालानी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. गंगवाल हे स्कूल ऑफ मेडिकल रिसर्च अँड टेक्नॉलॉजीच्या सल्लागार मंडळात सामील होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- Karauli Violence : खाकीतील माणुसकीचं दर्शन! करौली हिंसाचारादरम्यान कर्तव्यदक्ष पोलिसाचा फोटो व्हायरल, देशभरातून कौतुकाचा वर्षाव
- Karauli Violence : करौलीत दगडफेक, हिंसाचार आणि जाळपोळ, आतापर्यंत 46 जणांना अटक; कर्फ्यू 7 एप्रिलपर्यंत वाढवला
- Mumbai Crime : आधी एटीएममधील 77 लाखांची चोरी, नंतर एटीएम मशीनच पेटवली, कॅश लोड करणाऱ्या दोघांना अटक
- Delhi : चैत्र नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण दिल्लीत मांसबंदी, महापौरांची घोषणा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha