नवी दिल्ली : इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गॅनायझेशन (इस्रो) 2020च्या सुरुवातीलाच एक यशस्वी कामगिरी केली आहे. शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजून 35 मिनिटांनी जीसॅट-30 (GSAT-30)या दूरसंचार उपग्रहाचे यशस्वी प्रेक्षेपण केले आहे. जीसॅट-30 या उपग्रहाचं दक्षिण अमेरिकेतील कॅरो बेटावरून प्रक्षेपण करण्यात आलं. दरम्यान, इस्रोने यशस्वीपणे लॉन्च केलेल्या उपग्रहामुळे इंनरनेट क्षेत्रात नवी क्रांत्री होणार असून इंटरनेट आधिक गतीने चालणार आहे.


जीसॅट-30 हे जीसॅट सीरिजमधील शक्तिशाली उपग्रह आहे. ज्याच्या मदतीने देशातील संचारप्रणाली उत्तम होण्यास मदत होणार आहे. इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार, हा उपग्रह 'इनसॅट -4 ए'ची जागा घेणार आहे. तसेच या उपग्रहाची कव्हरेज क्षमताही अधिक आहे. इनसॅट-4 या उपग्रहाची मर्यादाही संपुष्टात येत असून तंत्रज्ञानातही मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. त्यामुळे अधिक शक्तिशाली आणि आधुनिक उपग्रहाची आवश्यकता होती. त्यामुळेच इस्रोने जीसॅट-30चं आज यशस्वी उड्डाण केलं आहे.





जीसॅट-30चं वजन 3 हजार 357 किलोग्राम आहे. असं सांगण्यात येत आहे की, लॉन्चिंगपासून 15 वर्षे हा उपग्रह कार्यरत राहणार आहे. या उपग्रहाला जिओ इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये स्थापित करण्यात आलं आहे. या उपग्रहामध्ये दोन सोलर पॅनल आणि बॅटरी आहे.


इस्रोने सांगितलं की, हा उपग्रह केयू बॅन्डमध्ये भारतीय मुख्य भूमि आणि बेटं, सी बॅन्डमध्ये खाडी देश, मोठ्या संख्येतील आशियाई देश आणि ऑस्ट्रेलियाला कव्हरेजसाठी मदत करणार आहे. सॅट नेटवर्क, टेलिव्हिजन अपलिंकिंग, टेलिपोर्ट सेवा, डिजिटल सॅटेलाइट, डीएसएनजी, डीटीएच टेव्हिजन सेवा आदी सेवांसाठी या उपग्रहाचा वापर होणार आहे. त्याशिवाय जलवायूमध्ये होणारे बदल आणि हवामानाचं भाकितही वर्तवण्यासाठी या उपग्रहाची मदत होणार आहे.


दरम्यान, यंदाच्या वर्षी भारताकडून एकूण 10 उपग्रह लॉन्च करण्यात येणार आहेत. यात आदित्य-एल1 उपग्रहाचाही समावेश आहे. या उपग्रहाला 2020पर्यंत लॉन्च केलं जाईल. मिशन सूर्याचा अभ्यास करणारा हा पहिला भारतीय उपग्रह असेल. इस्रोने गेल्या वर्षी 6 लॉन्च वाहन आणि 7 सॅटेलाइट लॉन्च केले होते.


तूतुकुडीमध्ये असणार देशाचं दुसरं स्पेस पोर्ट


दुसरं पोर्ट स्टेशन तमिळनाडूतील तूतुकुडीमध्ये होणार आहे. दरम्यान, येत्या दशकात इस्रोच्या पेटाऱ्यामध्ये मंगळ ग्रहापासून शनि ग्रहापर्यंत अनेक महत्त्वकांशी प्रोजेक्ट आहेत. ज्यांच्यावर वेगाने काम सुरू आहे. इस्रोच्या गगनयान मिशनसाठी रशिया मदत करणार आहे.


संबंधित बातम्या : 


चांद्रयान पुन्हा झेपावणार; चांद्रयान-3 ला केंद्र सरकारचा हिरवा कंदिल


Chandrayaan-3 | चांद्रयान-2 च्या प्रकल्प संचालिका एम.वनिता चांद्रयान-3 मोहिमेचा भाग नसणार


इस्रोच्या रिसॅट - 2BR1 उपग्रहाचं यशस्वी लॉन्चिंग, बालाकोटसारख्या मिशनमध्ये मदत मिळणार


"इस्रोची कामगिरी आमच्यासाठी प्रेरणादायी" 'नासा'कडून चांद्रयान 2 मोहिमेचं कौतुक