मुंबई: राष्ट्रीय अंतराळ संशोधन आणि अंतराळ प्रशासन 'नासा'ने भारताच्या चांद्रयान - 2 मोहिमेसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या प्रयत्नांचे कौतुक केलं आहे. नासाने ट्विटरमार्फत चांद्रयान 2 मोहिमेची प्रशंसा केली आहे.






"अंतराळात शोधकार्य कठीण गोष्ट आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान -2 उतरवण्याच्या इस्रोच्या प्रयत्नाचे आम्ही कौतुक करतो, तुम्ही केलेल्या या कामगिरीने आम्हाला प्रेरणा मिळाली आहे, भविष्यातील अंतराळ मोहिमांचं नियोजन आपण एकत्रित करु अशी आशा आहे" असं 'नासा'ने ट्वीट केलं.


जेव्हा चंद्राच्या अवघ्या काही अंतराच्या उंचीवर चांद्रयान 2 मोहिमेतील निक्रम लॅंडरशी संपर्क तुटला केव्हा इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या आणि तब्बल कोट्यावधी भारतीयांच्या चेहऱ्यावर निराशा पसरली. देशभरातच नाही तर जगभरातून इस्रोचं भरभरुन कौतुक करण्यात आलं. या कामगिरीची नासा या अमेरिकी अंतराळ संस्थेनेदेखील दखल घेतली आहे. त्याचप्रमाणे भविष्यात सोबत काम करण्याची इच्छादेखील नासाने ट्वीटमार्फत व्यक्त केली.



ऑर्बिटरने संपर्क तुटलेल्या लॅंडरचा फोटो पाठवला, विक्रमचं स्थान कळालं मात्र संपर्क नाही- के सिवन




अवघ्या जगाचं लक्ष लागलेली भारताची महत्वाकांक्षी चांद्रयान मोहीम चंद्राच्या 2.1 किलोमीटरवर जाऊन थांबली. चंद्राच्या 2.1 किलोमीटर अंतराजवळ गेल्यावर विक्रम लँडरशी संपर्क तुटला, पण अजूनही संपर्क होण्याची आशा कायम आहे. लँडरशी संपर्क तुटल्यानंतर इस्त्रोकडून ऑर्बिटद्वारे माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात होता. ऑर्बिटरने विक्रम लँडरची छायाचित्रे पाठवली आहेत.



पंतप्रधानांकडून वैज्ञानिकांना धीर


"मी तुमची मनस्थिती जाणतो, पण निराश होऊ नका, देश इस्रोच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. संपूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे," अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान 2 मोहीमेशी संबंधित प्रत्येकाला धीर दिला. "मी इथे तुम्हा उपदेश देण्यासाठी आलेलो नाही. तर सकाळी सकाळी तुमचं दर्शनाने प्रेरणा घेण्यासाठी आलोय. तुम्ही स्वत: प्रेरणेचा समुद्र आहात," असं मोदी म्हणाले.



विक्रम लँडरचं स्थान कळालं, इस्त्रो प्रमुख सीवन यांची माहिती


नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार चंद्राच्या 2.1 किलोमीटर अंतराजवळ गेल्यानंतर संपर्क तुटलेल्या विक्रम लँडरचं स्थान कळालं असल्याचं इस्रोचे प्रमुख के सीवन यांनी एएनआयला सांगितलं आहे. ऑर्बिटरने विक्रम लँडरचा फोटो पाठवला आहे. ऑर्बिटरकडून मिळालेल्या माहितीमुळे विक्रम लँडरचं स्थान कळालं आहे. इस्रोकडून विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न होत असल्याचं सीवन यांनी म्हटलं आहे.




संबंधित बातम्या


विक्रम लँडरचं स्थान कळालं, इस्त्रो प्रमुख सीवन यांची माहिती


इस्रो प्रमुख के सिवन यांना अश्रू अनावर, पंतप्रधान मोदींनी धीर दिला!


विक्रम लँडरशी संपर्क होण्याची आशा कायम, इसरोच्या शास्त्रज्ञांचं डेटा विश्लेषणाचं काम सुरु