First AI school in India : केरळमध्ये सुरु झाली भारतातील पहिली AI शाळा; शिक्षक नेमके कोण असणार?
First AI school of India : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते AI स्कूलचे उद्घाटन करण्यात आले.
First AI school of India : भारताला पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) शाळा मिळाली आहे. केरळची राजधानी तिरुअनंतपुरममध्ये देशातील पहिली AI शाळा शांतीगिरी विद्याभवन उघडण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी एआय स्कूलचे उद्घाटन केले. पहिली AI शाळा इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी असेल. ही AI शाळा iLearning Engine (ILE) USA आणि Vedic eSchool यांच्या सहकार्याने तयार करण्यात आली आहे. एआय टूल्सच्या मदतीने, अभ्यासक्रम डिझाइन, वैयक्तिकृत शिक्षण, मूल्यांकन आणि शाळेतील विद्यार्थी समर्थन यांसह शिक्षणाच्या विविध पैलूंमध्ये त्याचा वापर केला जाईल.
AI भविष्यातील आव्हानांसाठी मुलांना तयार करणार
शाळेच्या अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, या शाळेत पारंपारिक अध्यापन पद्धती बरोबरच, विद्यार्थ्यांना एआयच्या (AI) मदतीने प्रगत साधने आणि संसाधने दिली जातील, ज्याच्या मदतीने विद्यार्थी भविष्यातील आव्हानांसाठी तयार होतील. AI स्कूल हे जगातील सर्वात प्रगत शैक्षणिक प्लॅटफॉर्म iLearning Engines (ILE) USA ने Vedhik eSchool च्या सहकार्याने डिझाईन केलेले आहे. विद्यार्थ्यांना शिकण्याची ही नवीन पद्धत खरोखर चांगले शिक्षण देणार आहे आणि मुले खूप काही शिकणार आहेत असेही अधिकारी म्हणाले.
भारतातील पहिल्या AI शाळेचं नेमकं वैशिष्ट्य काय?
- ही AI शाळा 8वी ते 12वी पर्यंतच्या मुलांसाठी तयार करण्यात आली आहे. या शाळेत मुलांना अनेक शिक्षक, विविध स्तरांची चाचणी, अभियोग्यता चाचणी, समुपदेशन, करिअर नियोजन आणि स्मरण तंत्र याविषयी माहिती दिली जाते.
- या शाळेत मुलांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच कौशल्य विकासही शिकवला जातो. मुलाखत कौशल्ये, ग्रूप डिस्कशन, गणित आणि लेखन कौशल्ये, शिष्टाचारात सुधारणा, इंग्रजी आणि इमोशनल वेल बिंग याबद्दलही माहिती दिली जाते.
- शालेय परीक्षांव्यतिरिक्त, मुलांना JEE, NEET, CUET, CLAT, GMAT आणि IELTS सारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी देखील तयार केले जाते. जेणेकरून विद्यार्थी स्पर्धेसाठी तयार होतील.
- AI शाळेचे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी नियोजन करण्यास मदत करते. हे त्यांना प्रतिष्ठित परदेशी विद्यापीठांमध्ये शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी मार्गदर्शन करते, जेणेकरून विद्यार्थी परदेशात शिक्षण घेऊ शकतील.
महत्त्वाच्या बातम्या :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI