Indian Railways: देशातील 6100 रेल्वे स्थानकांवर मिळणार हायस्पीड फ्री WiFi, असा करा तुमच्या फोनशी कनेक्ट
Indian Railways Free WiFi: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आतापर्यंत 6100 रेल्वे स्थानकांवर हायस्पीड वायफाय इंटरनेट कनेक्शनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
Indian Railways Free WiFi: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आतापर्यंत 6100 रेल्वे स्थानकांवर हायस्पीड वायफाय इंटरनेट कनेक्शनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता तुम्ही रेल्वे स्थानकांवर वायफाय वापरून तुमचे इंटरनेट संबंधित काम सहज करू शकता. 'रेलटेल'ने मंगळवारी याबाबत माहिती दिली.
RailTel ने एका परिपत्रकात म्हटले आहे की, "उत्तर रेल्वेच्या लखनौ विभागातील उबराणी रेल्वे स्थानकावर (उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील) वायफाय सुविधा सुरू केल्यानंतर, आज (मंगळवार) 6100 स्थानकांवर वायफायची सुविधा सुरु करण्यात आली आहे."
रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीतील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम RailTel ने सांगितले की, या सुविधेचा देशभरातील सर्व स्थानकांवर विस्तार करण्यात येणार आहे. हॉल्ट स्टेशन्स याला अपवाद आहेत. आपल्या परिपत्रकात त्यांनी सांगितलं आहे की, वरील 6100 स्थानकांपैकी 5000 हून अधिक स्थानके ग्रामीण भागात आहेत. 2015 च्या रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय इंटरनेट सुविधा पुरवण्याचा प्रकल्प संकल्पित करण्यात आला होता.
मोफत वायफाय कसे वापरावे
- तुमच्या स्मार्टफोनवर वायफाय सेटिंग्ज उघडा
- उपलब्ध नेटवर्क शोधा.
- RailWire नेटवर्क निवडा.
- आता तुमच्या मोबाईल ब्राउझरमध्ये railwire.co.in वेबपेज उघडा.
- आता तुमचा 10 नंबरचा मोबाईल नंबर टाका.
- तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल.
- RailWire कनेक्ट करण्यासाठी हा OTP पासवर्ड म्हणून वापरा.
- आता तुम्ही Railwire शी यशस्वीरित्या कनेक्ट झाला आहात आणि इंटरनेटवर मोफत प्रवेश करू शकता.
दरम्यान, डिजिटल इंडिया बनवण्याच्या दिशेने सरकारने अनेक पावले उचलली आहेत. सार्वजनिक ठिकाणी मोफत वायफाय उपलब्ध करून देणे हे सरकारचे असेच एक पाऊल असल्याचे बोलले जात आहे. इंटरनेट आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज Google Inc. ने रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा देण्यासाठी रेल्वे टेलिकम्युनिकेशन कंपनी RailTel सोबत भागीदारी केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :