एक्स्प्लोर

Coronavirus : राष्ट्रपतींचा पगार किती? 30 टक्के कपात केल्यास किती पगार मिळणार?

राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांनी स्वत:हून आपल्या पगारात 30 टक्के कपातीची शिफारस करण्यात आल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोना व्हायरस दिवसेंदिवस फोफावत चालला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 4281 वर जाऊन पोहोचला आहे. कोरोना व्हायरसचं संकट दिवसेंदिवस गडद होत चाललं आहे. परिणामी देशाला मोठ्या आर्थिक बळाची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सर्व खासदाराच्या पगारात 30 टक्के कपात करण्यात आली आहे. याशिवाय राष्ट्रपती, उपराष्ट्रपाती आणि पंतप्रधान यांच्या पगारात देखील 30 टक्के कपात करण्यात आली आहे. आता आपण जाणून घेऊया की देशाच्या राष्ट्रपतींना किती पगार मिळतो आणि 30 टक्के कपात केल्यावर त्यांना पुढील एका वर्षासाठी किती पगार मिळणार आहे. किती आहे राष्ट्रपतींचा पगार? संसद अधिनियम 1954 नुसार पगार, भत्ता आणि पेंशनवर 2018 मध्ये संशोधन करण्यात आलं. या संशोधनात राष्ट्रपतींचा पगार दर महिना पाच लाख करण्यात आला. या आधी राष्ट्रपतींचा पगार 1.5 लाख होता. 30 टक्के कापातीनंतर राष्ट्ररतींना मिळणारा पगार कोरोना व्हायरसचं वाढता प्रादुर्भाव पाहता राष्ट्रपतींच्या पागारात 30 टक्क्यांची कपात करण्यात येणार आहे. राष्ट्रपतींना पाच लाख रुपये पगार आहे. त्यात 30 टक्के घट केल्यास उरतात 3.5 लाख रुपये. म्हणजेच पुढील एक वर्ष राष्ट्रपतींना तीन लाख पन्नास हजार रुपये पगार मिळणार आहे. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांनी स्वत:हून आपल्या पगारात 30 टक्के कपातीची शिफारस करण्यात आल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. तसेच मोदी सरकारने खासदारांच्या पगारात 30 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतलाय. केंद्रीय कॅबिनेटमध्ये या अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली आहे. पुढच्या एक वर्षासाठी ही पगार कपात राहणार आहे. तर, दोन वर्षे खासदार निधीचे पैसेही मिळणार नाहीत. VIDEO | #Corona Help | राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपालांची स्वेच्छेने 30% पगार कपात, खासदारांच्या पगारातही कपात देशात कोरोनाचा आकडा वाढला आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 4281 वर जाऊन पोहोचला आहे. त्यातील 3851 सक्रिय रूग्ण असून त्यापैकी 1445 रूग्ण हे तब्लिगींच्या धार्मिक कार्यक्रमातील असून काही त्यांच्या संपर्कात आलेले आहेत. आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या रूग्णांपैकी 76 टक्के पुरूष आणि 24 टक्के महिला आहेत. देशात COVID-19 मुळे आतापर्यंत 109 लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने कोरोना व्हायरसच्या रूग्णांचे आकडे सर्वांसमोर जाहीर केले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 63 टक्के मृत्यू 60 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींचे झाले आहेत. तर 30 टक्के मृत्यू हे 40 ते 60 दरम्यान वय असणाऱ्या लोकांचे झाले आहेत. तर 7 टक्के कोरोनाग्रस्त हे 40 पेक्षा कमी वयाचे आहेत. VIDEO | World Corona Update | जगभरात साडे 13 लाखांहून अधिक कोरोनाग्रस्त; अमेरिका, स्पेन, इटलीत कोरोनाचा कहर

महत्त्वाच्या बातम्या

India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget