(Source: ECI | ABP NEWS)
India Pakistan War Karachi Port: भारतीय नौदल कराची बंदरावर हल्ला करण्यासाठी पूर्णपणे तयार होते, व्हाईस ॲडमिरल ए.एन. प्रमोद यांचं शत्रूच्या काळजात धडकी भरवणारं उत्तर
India attacks on Pakistan: भारतीय सैन्याने पाकिस्तानवर हल्ला केला त्यामध्ये पाकचे मोठे नुकसान झाले. भारताचे राफेल विमान पाकिस्तानने खरोखरच पाडले का, याचं उत्तर लष्करी अधिकाऱ्यांनी दिले.

India Pakistan War: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये भारतीय नौदलाच्या युद्धनौका आणि सगळी यंत्रणा अरबी समुद्रात उतरवण्यात आली होती. उत्तर अरबी समुद्रात भारतीय नौदलाच्या (India Navy) युद्धनौका आघाडीवर तैनात करण्यात आल्या होत्या. आम्ही भारतीय वायूदल आणि सैन्यदलासोबत संयुक्त कारवाईसाठी तयार होतो. भारतीय नौदलाने समुद्रात आणि जमिनीवर मारा करण्याची तयारी केली होती. त्यावेळी भारतीय नौदल हे पाकिस्तानमधील महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी सज्ज होते. यामध्ये कराचीचा (Karachi Port) समावेश होता. आम्ही या सगळ्या ठिकाणांवर आम्हाला हवे तेव्हा हल्ला करु शकत होतो, असे वक्तव्य भारतीय नौदलाचे व्हाईस ॲडमिरल ए.एन. प्रमोद यांनी केले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीनंतर रविवारी भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन ऑपरेश सिंदूर आणि त्यानंतर पाकिस्तानवर करण्यात आलेल्या हल्ल्यांबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी नौदलाचे व्हाईस ॲडमिरल ए.एन. प्रमोद यांनी पाकिस्तानच्या कराची बंदराचा उल्लेख केला. भारतीय नौदल पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून होते. भारतीय युद्धनौका या कोणत्याही क्षणी निर्णायक कारवाईसाठी सज्ज होत्या. पाकिस्तानमधील काही महत्त्वाची ठिकाणी भारतीय नौदलाच्या टार्गेटवर होती. नौदल हल्ला करण्यासाठी आणि हल्ला रोखण्यासाठी अशा दोन्ही गोष्टींसाठी सज्ज होते. भारतीय नौदलाची यंत्रणा आघाडीवर तैनात असल्याने पाकिस्तानी वायूदल आणि नौदल बचावात्मक पावित्र्यात गेले होते. त्यामुळे ते कराची बंदरागत आणि किनारपट्टीलगत तैनात होते. भारतीय नौदल त्यांच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवू होते, असे व्हाईस ॲडमिरल ए.एन. प्रमोद यांनी सांगितले.
यावेळी व्हाईस ॲडमिरल ए.एन. प्रमोद यांनी पाकिस्तानला निर्वाणीचा इशाराही दिला. आता पाकिस्तानने कोणतीही आगळीक करण्याची हिंमत केली तर त्यांना माहिती आहे की, भारतीय सैन्य काय करेल, असे त्यांनी म्हटले.
#WATCH | Delhi: #OperationSindoor | Vice Admiral AN Pramod says "...This time if Pakistan dares to take any action, Pakistan knows what we are going to do." pic.twitter.com/5fMq3LjMF8
— ANI (@ANI) May 11, 2025
Pakistan Army: भारतीय सैन्याच्या हल्ल्यात पाकिस्तानचे किती सैनिक ठार?
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये किमान 100 दहशतवादी आणि पाकिस्तानच्या 35 ते 40 सैनिकांचा खात्मा झाल्याची माहिती भारतीय लष्कराच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. आयसी 814 विमानाचे अपहरण, पुलवामा हल्ल्याच्या कटात सहभागी असलेले युसूफ अझर, अब्दुल मलिक रौफ आणि मुदस्सिर अहमद यांच्यासारखे दहशतवाद्यांचे म्होरकेही 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झाल्याची माहिती देण्यात आली.
आणखी वाचा
























