एक्स्प्लोर

Indian Navy Recruitment 2021 : दहावी उत्तीर्ण आहात? इंडियन नेव्ही 'या' पदासाठी आजपासून भरती प्रक्रिया सुरु

Indian Navy Recruitment 2021 : दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी चालून आली असून 'सेलर' पदासाठी इंडियन नेव्ही मध्ये भरती प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. 

मुंबई :  भारतीय नौदल अर्थात इंडियन नेव्हीमध्ये 'सेलर' 33 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. सेलर या पदासाठी फक्त दहावी पास अशी पात्रता असून नेव्ही मध्ये करियर करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांनी या पदासाठी आजपासून म्हणजे 2 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट या दरम्यान अर्ज करावे. आजपासून या भरतीची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक उमेदवारांनी joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी. 

इंडियन नेव्हीच्या रिक्रुटमेंट ड्राईव्हच्या माध्यमातून 33 सेलर पदांसाठी भरती करण्यात येणार असून त्यासाठी जवळपास 300 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे. ही भरती ऑक्टोबर 2021 च्या बॅचसाठी करण्यात येणार आहे. 

आवश्यक पात्रता

शैक्षणिक पात्रता 
उमेदवारांनी केंद्रीय शिक्षण मंडळाने मान्यता दिलेल्या कोणत्याही शाळेतून दहावी उत्तीर्ण असायला हवं. 

वयोमर्यादा
उमेदवाराचा जन्म 1 ऑक्टोबर 1996 ते 30 सप्टेंबर 2004 च्या दरम्यानचा असावा. महत्वाचं म्हणजे या वयोमर्यादेत कोणत्याही प्रवर्गाला विशेष सवलत देण्यात आली नाही. 

शुल्क
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. 

निवड प्रक्रिया
अर्ज केलेल्या जवळपास 300 उमेदवारांना म्यूजिक टेस्ट आणि पीएफटी म्हणजे मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे. यामध्ये सिलेक्ट होण्यासाठी उमेदवाराला शारीरिक चाचणीला सामोरं जावं लागणार आहे. या उमेदवारांना सात मिनीटात 1.6 किमीची धाव घ्यावी लागणार आहे. तसेच 20 उठा-बशा आणि 10 पुश-अप काढावे लागणार आहेत. 

वेतन
भरती प्रक्रियेतून निवड झाल्यानंतर सुरुवातीच्या ट्रेनिंग प्रक्रियेच्या दरम्यान, निवड झालेल्या उमेदवारांना स्टायपेंड देण्यात येणार आहे. तो 14,600 रुपये इतका असणार आहे. त्यानंतर ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांना 3 डिफेन्स पे नुसार 
(21,700 ते 69,100) रुपये वेतन देण्यात येणार आहे. त्याचसोबत त्यांना डीए आणि 5200 रुपये एमएसपी देण्यात येणार आहे. 

त्यामुळे ही संधी सोडू नका. आजच joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या आणि अर्ज करा. 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Embed widget