एक्स्प्लोर
यंदा देशात सरासरीच्या 96 टक्के पाऊस, शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा
भारतात शेतीसाठी मान्सूनचं अंत्यत महत्त्व आहे. कारण वर्षभर होणाऱ्या पावसामध्ये 70 टक्के योगदान मान्सूनचं असतं.
नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी चांगली बातमी दिली आहे. अल निनोचा प्रभाव कमी होणार असल्याने यंदा मान्सून सामान्य असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सून हा भारताच्या कृषीप्रधान अर्थव्यवस्थेचा कणा आहे. देशातील निम्म्याहून शेती मान्सूनवर अवलंबून आहे. मान्सूनबाबत हवामान विभागाचा हा पहिला अंदाज आहे. पुढील अंदाज जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वर्तवला जाईल.
सरासरीच्या 96 टक्के पाऊस
हवानामा विभागाच्या माहितीनुसार, जून ते सप्टेंबरपर्यंत असलेल्या मान्सूनदरम्यान, सरासरीच्या तुलनेत 96 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. "आमच्या अंदाजात 5 टक्के कमी किंवा जास्त अंतर असू शकतं," असंही आयएमडीने म्हटलं आहे.
मान्सूनमध्ये 70 टक्के पाऊस
भारतात शेतीसाठी मान्सूनचं अंत्यत महत्त्व आहे. कारण वर्षभर होणाऱ्या पावसामध्ये 70 टक्के योगदान मान्सूनचं असतं. यामुळे तलावं भरतात आणि शेतीसाठी पाणी मिळतं. पावसावर कोट्यवधी लोकांची उपजीविका चालते. शिवायत खाद्यपदार्थांच्या किंमतीही पावसावरच अवलंबून असतात. तांदूळ, गहू आणि कापूस उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे.
काय आहे अलनिनो?
पॅसिफिक महासागरातली पाण्याचं तापमान सरासरीपेक्षा वाढतं या घटनेला अलनिनो म्हटलं जातं. ही घटना दक्षिण अमेरिकेतील पेरु या देशाच्या समुद्रकिनारपट्टीवर दिसते. मागील काही वर्षांपासून पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाच्या तापमानात वाढ होत आहे. अलनिनोमुळे समुद्राच्या वाऱ्यांची दिशा बदलते. परिणामी पर्जन्यक्षेत्रात पाऊस पडत नाही. याउलट ज्या परिसरात पाऊस पडत नाही, तिथे मुळधार पाऊस पडतो.
मान्सूनबाबत स्कायमेटचा अंदाज
0% अंदाज आहे की सरासरीच्या 110 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडेल
0% अंदाज आहे की, सरासरीच्या 105 ते 110 टक्क्यांदरम्यान पाऊस पडेल
30% अंदाज आहे की, सरासरीच्या 96 ते 104 टक्के पाऊस पडेल
55% अंदाज आहे की सरासरीच्या 90 ते 95 टक्के पाऊस होईल
15% अंदाज आहे की सरासरीच्या 90 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement