एक्स्प्लोर
पैसे मोजल्यानंतर हात स्वच्छ धुवा, भारतातील नोटा जीवाणू बाधित!
भारतात 5, 10, 20, 50 आणि शंभरसह सर्वच नोटा जीवाणू बाधित आहेत.
मुंबई: नोटा हाताळायला कोणाला नको वाटतात? अगदी लहान मुलांनाही खाऊच्या बदल्यात नोटा दाखवल्या तर तीसुद्धा धावत येतील, मात्र याच नोटा चिमुकल्यांसह तुमच्या-आमच्या जीवाला धोकादाय ठरत आहेत.
भारतात 5, 10, 20, 50 आणि शंभरसह सर्वच नोटा जीवाणू बाधित आहेत.
दुनिया पैशांवर चालते आणि पैशांची भाषा बोलते म्हणतात.. पैशाशिवाय तुमचं पानही हलत नाही. जिथे जाल तिथे हातात नोटा खेळवाव्याच लागतात.
बाजारात भाजी खरेदी करण्यासाठी - - पैसे मोजा, पेट्रोल, डिझेल भराचयं - पैसे मोजा, साधी पाणीपुरी खाल्ली तरी पैसे मोजावे लागतात आणि एटीएम मधून आलेले - पैसेही मोजायचेच असतात.
रोज कित्येक वेळा आपण अशाप्रकारे पैशाच्या नोटा हाताळत असतो. मात्र थोडं थांबा. कारण याच नोटा तुमच्या जिवावर उठू शकतात. हा आमचा नाही तर फूड सेफ्टी अँड स्टँटर्ड अथॉरिटी ऑफ इंडियांचा दावा आहे.
इंटरनॅशनल जर्नल ऑफ डेंटल क्लिनीकने भारतात 5, 10, 50 आणि 100 च्या नोटा गोळा केल्या. भाजी मार्केट, दूध डेअरी, बँक, पेट्रोल पंप अशा ठिकाणांवरुन या नोटा जमा करण्यात आल्या होत्या. ज्यावेळी या नोटांवर रिर्सच करण्यात आलं त्यावेळेस समजलं की या सर्वच्या सर्व नोटा जीवाणूंनी बाधित होत्या.
या बाधित नोटा सामान्यांच्या संपर्कात आल्याने विविध आजारांशी गाठ अगदी साहजिक आहे.
नोटांवर असतात जीवघेणे जिवाणू
नोटांवर पाच प्रकारांचे जीवाणू आढळतात
- ई कोलाई
- स्टेफाइलोकोकस
- स्लमोनेला एंट्रीटाइडिस
- स्ट्रेप्टोफोकस
- प्रोटियस असे जीवाणू असतात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement