Use Of Term Martyr: 'शहीद किंवा हुतात्मा शब्दांचा वापर चुकीचा ; वीर जवानांसाठी 'या' शब्दांचा करा वापर'; भारतीय लष्कराची माहिती
Use Of Term Martyr : भारतीय लष्कराच्या मुख्यालयानं (Indian Army) आपल्या सर्व कमांडला पत्र लिहून याबाबतची सुचना दिली आहे.
Use Of Term Martyr : जीवाची पर्वा न करता देशाच्या संरक्षणासाठी भारतीय सैन्य दलाचे सैनिक हे शत्रूंसोबत लढत असतात. अनेक सैनिकांना लष्करी कारवाईत प्राणाची आहुती द्यावी लागते. या वीर जवानांसाठी शहीद जवान या शब्दांना वापर केला जातो. पण भारतीय भारतीय लष्करानं (Indian Army) शहीद किंवा हुतात्मा या शब्दाचा वापर करू नये असे म्हटलं आहे. भारतीय लष्कराच्या मुख्यालयानं आपल्या सर्व कमांडला पत्र लिहून याबाबतची सुचना दिली आहे.
भारतीय लष्करानं लिहिलेल्या पत्रामध्ये सांगितलं की, 'शहीद किंवा हुतात्मा शब्दांचा वापर करणं चुकीचं आहे. काही सेनेच्या ऑफिसर्सकडून आणि मीडियाकडून सैनिकांसाठी शहीद या शब्दांचा वापर केला जातो. ज्यांनी देशासाठी बलिदान दिले आहे.'
पत्रात पुढे लिहिले आहे, 'ज्या व्यक्तीनं धर्मिक किंवा राजकीय आस्था, विचारांसाठी प्राण गमावले आहेत. अशा व्यक्तींसाठी शहीद किंवा हुतात्मा (Martyr) हा शब्द वापरला जातो. त्यामुळे भारतीय सैनिकांसाठी शहीद (Martyr) या शब्दाचा वापर करणं चुकीचे आहे. '
लष्कराच्या मुख्यालयाकडून लष्कराच्या सर्व कमांडला असं सांगण्यात आलं की वीर सैनिकांना या शब्दांचा वापर करावा-
किल्ड इन अॅक्शन
लेड डाउन देअर लाइफ
सुप्रीम सेक्रिफाइस फॉर नेशन (देशासाठी दिले सर्वोच्च बलिदान)
फॉलन हीरोज (वीरगती प्राप्त)
इंडियन आर्मी ब्रेव्स (भारतीय सेनेचे वीर)
फॉलन सोल्जर्स
महत्त्वाच्या बातम्या:
- Operation Ganga : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणण्यासाठी केंद्र सरकारचे ‘ऑपरेशन गंगा’
- Russia Ukraine war : रशिया-युक्रेन युद्धाचा भारतावर परिणाम, पेट्रोल-डिझेलच्या दरात होणार वाढ, अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांचे सूतोवाच
-
Sangli Mseb Fire : शेतकरी आंदोलनाचा भडका, सांगलीत अज्ञात शेतकऱ्यांनी पेटवलं MSEB चं सब स्टेशन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha