(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चीन-पाकिस्तानला धडकी भरणार, रशियाकडून खरेदी केलेली S-400 मिसाईल पंजाबमध्ये होणार तैनात
S-400 Triumf : चीन आणि पाकिस्तानच्या कोणत्याही हल्ल्याला निकामी करण्यामध्ये सक्षम असलेली ‘एस-400’ ही मिसाईलची पहिली खेप पंजाबमध्ये लवकरच दाखल होणार आहे.
S-400 Triumf : चीन आणि पाकिस्तानच्या कोणत्याही हल्ल्याला निकामी करण्यामध्ये सक्षम असलेली ‘एस-400’ ही मिसाईलची पहिली खेप पंजाबमध्ये लवकरच दाखल होणार आहे. रशियाकडून खरेदी केलेली S-400 Triumf मिसायइलची पहिली खेप फेब्रुवारीपर्यंत पंजाबमध्ये पोहोचेल, अशी माहिती लष्काराकडून देण्यात आली आहे. रशियाकडून खरेदी केलेल्या ‘एस-400’ मिसाईलला पंजाबमधील हवाई दल येथे दाखल होणार आहे. ज्या ठिकाणी एस 400 मिसाईल तैनात करण्यात येणार आहे, हे ठिकाण पाकिस्तान सिमेच्या जवळ येते.
2018 मध्ये रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन हे भारतात आले होते. त्याचवेळी S-400 या अँटी मिसाईल सिस्टीमच्या खरेदीबाबत करार झाला होता. हवाई बचावाची सर्वात आधुनिक सिस्टीम मानली जाते. हा करार होऊ नये यासाठी अमेरिकेचा मोठा दबाव त्यावेळी भारतावर होता. S-400 अँटी मिसाईल सिस्टीमवरुन चार प्रकारचे मिसाईल एकाचवेळी डागले जाऊ शकतात. - कमीत कमी शंभर फूट ते जास्तीत जास्त 45 हजार फुटावरचं कुठलंही लक्ष्य भेदण्याची क्षमता - रडारपासून वाचण्याची क्षमता, कुठल्याही पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक जाम होणार नाही याची खात्री - अडीचशे किलोमीटर पर्यंत अचूक निशाणा लावण्याची क्षमता
Indian Air Force is likely to complete deployment of first regiment of S-400 Triumf missile systems at an airbase in Punjab by February: Military officials
— Press Trust of India (@PTI_News) January 1, 2022
‘एस-400’ मिसाईल ची ताकद काय आहे
- ‘एस-400’ हे आजच्या घडीला जगातली सर्वात आधुनिक मिसाईल सिस्टीम आहे. अमेरिकेच्या थाड मिसाईल सिस्टीमपेक्षाही त्याची मारक क्षमता अधिक आहे.
- ‘एस-400’ हवेत 30 किलोमीटर उंच आणि जमिनीवर 400 किलोमीटर रेंजमध्ये कुठलंही लक्ष्य टिपू शकतं. भारताकडे सध्या असलेल्या मिसाईलची क्षमता 100 किलोमीटर आहे. त्या तुलनेत एस-400 मुळे ही ताकद चार पटीनं वाढणार आहे.
- आणीबाणीच्या वेळी अगदी पाच मिनिटांत हे मिसाईल लक्ष्य टिपण्यासाठी तयार होतं. शिवाय एकावेळी जास्तीत जास्त 100 लक्ष्यांवर मारा करण्याची क्षमता त्यात आहे.
- चीन आणि पाकिस्तानकडून मिळत असलेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर हे मिसाईल भारतासाठी महत्वाचं आहे.
संबधित बातम्या :
काय आहे रशियाची S-400 वायु संरक्षण प्रणाली?
अमेरिकेला न घाबरता भारत-रशियामध्ये महत्वाचा शस्त्रास्त्र करार
दिल से दोस्ती! अमेरिकेचा दबाव झुगारुन भारताने रशियासोबत मैत्री निभावली