नवी दिल्ली : भारताची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर (UNSC) अस्थायी सदस्य म्हणून आठव्यांदा निवड करण्यात आली. भारताला एकूण 192 वैध मतांपैकी 184 मते मिळाली. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. त्रिमूर्ती यांनी भारताच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला आणि सांगितले की, 'कोरोना विषाणूच्या काळात सुरक्षा परिषदेवर आपली निवड होणं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीक्षेपाची आणि जागतिक नेतृत्त्वाला प्रेरणा देणारी आहे.', ते पुढे बोलताना म्हणाले की, 'भारत एका महत्त्वाच्या वेळी सुरक्षा परिषदेचा सदस्य बनला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की, कोविडदरम्यान आणि कोविडनंतरच्या काळात भारत कायम नेतृत्व करेल आणि एका चांगल्या बहुपक्षीय व्यवस्थेला नवी दिशा देईल.'



इंडिया अॅट यूएन, एनवाय यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती शेअर केली गेली. भारताच्या या मोठ्या यशाबद्दल टी.एस. त्रिमूर्ती यांनी एका व्हिडीओ मेसेजमार्फत ही माहिती शेअर केली. हा व्हिडीओ ट्वीट करताना त्यांनी लिहिलं की, 'सदस्य देशांनी भरघोस पाठिंबा देऊन सन 2021-22 साठी सुरक्षा परिषदेच्या तात्पुरत्या जागेसाठी भारताची निवड केली. भारताला 192 पैकी 184 मतं पडली आहेत.'


पाहा व्हिडीओ : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर भारताची अस्थायी सदस्य म्हणून निवड



भारत याआधी सात वेळा सदस्य राहिला


भारत यााधी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर (UNSC) सात वेळा सदस्य राहिला असून 1950-1951, 1967-1968, 1972-1973, 1977-1978, 1984-1985, 1991-1992 आणि शेवटी 2011 -2012 मध्ये भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर अस्थायी सदस्य राहिला आहे.


आशिया पॅसिफिक समूहातील एकमेव उमेदवार


आशिया पॅसिफिक समूहातून भारताच्या उमेदवारीचं समर्थन करणाऱ्या 55 देशांमध्ये अफगानिस्तान, बांग्लादेश, भूटान, चीन, इंडोनेशिया, इराण, जपान, कुवेत, किर्गिझस्तान, मलेशिया, मालदीव, म्यामां, नेपाळ, पाकिस्तान, कतर, सौदी अरेबिया, श्रीलंका, सीरिया, तुर्की, संयुक्त अरब अमीरात आणि व्हिएतनाम यांचा समावेश आहे.


दरम्यान, दरवर्षी 193 सदस्यांसह युएन जनरल असेंबली दोन वर्षांच्या मुदतीसाठी पाच अस्थायी सदस्यांची निवड करते. तर या परिषदेचे पाच स्थायी सदस्य आहेत, ज्यामध्ये चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


सहा वर्षात मोदी-जिनपिंगच्या 18 भेटी, मैत्रीचे गोडवे गायले, पण पदरी विश्वासघातच


आता कपडे करणार पीपीई किटचं काम, IIT-ISM कडून कोरोना व्हायरस नष्ट करणाऱ्या कोटिंगची निर्मिती

परराष्ट्र खात्यानं चीनला तीव्र शब्दात सुनावलं, चिनी सैन्याचा हल्ला नियोजित कट