नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता प्रत्येकाला पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट किट उपलब्ध करुन देणे शक्य नाही. ही बाब आणि गरज लक्षात घेत आयआयटी आयएसएमने स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करत कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी पॉलिमेरिक सुपर हायड्रोफोबिक कोटिंग तयार केलं आहे. कोरोना व्हायरस या कोटिंगच्या संपर्कात आल्यानंतर नष्ट होतात. नॅनोटक्नोलॉजीवर आधारीत आयआयटी आयएमएमचं हे तंत्रज्ञान कोरोनासह भविष्यातील इतर सर्व व्हायरसचा खात्मा करण्यास सक्षम आहे.
सुपर हायड्रोफोबिक कोटिंग तयार करणारे आयएसएमचे रसायय विभागाचे प्रो. आदित्य कुमार यांनी म्हटलं की, अनेक चाचण्यानंतर या कोटिंगला तयार करण्यात आलं आहे. कोरोनाचे विषाणू प्लास्टिक, धातू किंवा इतर कोणत्याही वस्तूंवर जीवंत राहतो. अशात ही कोटिंग कोरोनापासून बचावासाठी फायदेशीर ठरणार आहे. या सुपर हायड्रोफोबिक कोटिंगचं पेटंट तयार करण्याचं काम सुरु आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मन की बात कार्यक्रमात या नव्या तंत्रज्ञानाची स्तुती केली. मन की बातच्या ट्विटर हँडलवरुनही याची अपडेट देण्यात आली आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करुन आयएसएमच्या शास्त्रज्ञांनी नॅनो टेक्नॉलॉजीच्या मदतीने पॉलिमेरिक सुपर हायड्रोफोबिक कोटिंग तयार केलं आहे. कोरोना व्हायरसही नष्ट करण्याची क्षमता यामध्ये आहे.
Coronavirus Update | भारतात कोरोनाबाधित रुग्णांची मृत्यूची संख्या 11 हजारांपेक्षा जास्त