एक्स्प्लोर

सावधान! देशातील वातावरणात बदल, पुढील 6 ते 7 दिवस तुफान पाऊस पडणार, महाराष्ट्रात काय असणार पावसाची स्थिती? 

राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. अनेक भागात मान्सूनपूर्ण पावसाला (Rain) जोरदार सुरुवात झाली आहे.

Weather News :  राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाला (Rain) जोरदार सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील 6 ते 7 दिवस पश्चिम किनाऱ्यावर म्हणजे गुजरात, कोकण, गोवा, कर्नाटक आणि केरळमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकणसह गोवा आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवर अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज 

दक्षिण कोकण-गोवा किनाऱ्यापासून पूर्वमध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र आहे. ते उत्तरेकडे सरकण्याची आणि 23 मे 2025 च्या संध्याकाळच्या सुमारास तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळं पुढील  6 ते 7 दिवस पश्चिम किनाऱ्यावर (गुजरात, कोकण आणि गोवा, कर्नाटक आणि केरळ) मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान  विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजपासून म्हणजे 22 ते 24 मे 2025 रोजी कोकण आणि गोव्यात आणि 24 मे 2025 रोजी कर्नाटकच्या किनारपट्टीवर अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

पुढील 2 ते 3 दिवसांत केरळमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती

पुढील 2 ते 3 दिवसांत केरळमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. 22 ते 26 मे 2025 रोजी राजस्थानमध्ये उष्णतेची लाट ते तीव्र लाटांची परिस्थिती आहे. 22 आणि 23 मे 2025 रोजी पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि पूर्व राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यामधील गुहागरमध्ये पावसाचा जोर वाढला

रत्नागिरी जिल्ह्यामधील गुहागरमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळं सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. पेरणीच्या आधीच मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची कामे देखील खोळंबोली आहेत, शिवाय आंबा बागायतदारांना देखील पावसाचा मोठा परिणाम झाल्याचे बघायला मिळत आहे. हवामान विभागाकडून आज आणि उद्या जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

तीन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

मागील तीन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात मान्सूनपूर्व वादळी वारा व विजेच्या कडकडाट पावसाने हजेरी लावीत आहे. आज सकाळपासून ढगाली वातावरण असून अकरा वाजता पासून पावसाची रिमझिम उघडीप सुरू आहे. दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांची उकड्यापासून सुटका झाली. आगामी खरीप हंगामाच्या मशागतीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरत आहे. तर काही भागात उन्हाळी पिके आणि फळबागेळा पालेभाज्या यांना काहीसा फटका बसत आहे.
 
महत्वाच्या बातम्या:
 
Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा

व्हिडीओ

Sambhajinagar Phulambri : इंग्रजी शाळेतलं भयंकर कृत्य, संभाजीनगर हादरलं Special Report
Mumbai Mayor : रितू तावडेंनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार Special Report
Rohit Pawar on Ajit Pawar : रोहित पवारांच्या आरोपांतील 'तो' नेता कोण? Special Report
Chandrapur Shivsena- BJP : चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला डच्चू Special Report
Solapur Ram Satpute : राम सातपुतेंच्या जीवाला धोका? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
Mutual Fund : सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, आकडेवारी समोर, जाणून घ्या कारणं
सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, जाणून घ्या कारणं  
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
Embed widget