नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत आता सातत्याने वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात 43,263 कोरोनाबाधितांची भर पडली आहे तर 338 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 40,567 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्या आधी बुधवारी 37,875 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती तर 369 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. 


केरळमध्ये कोरोनाचा कहर सुरुच
देशातील दर दिवशीच्या कोरोना रुग्णसंख्येपैकी सर्वाधिक रुग्णसंख्या ही केरळमधून समोर येत आहे. बुधवारी केरळमध्ये 30,196 नव्या रुग्णांची भर पडली तर 181 जणांचा मृत्यू झाला. बुधवारची कोरोनाबाधितांची ही संख्या देशातील एकूण रुग्णसंख्येच्या 70 टक्क्यांहून अधिक आहे. 


Maharashtra Corona Update : राज्यात आज  4,174 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट 97. 09 टक्के


देशातील कोरोनाची सद्यस्थिती : 



  • कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 31 लाख 39 हजार 981

  • एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 23 लाख 04 हजार 618

  • सक्रिय रुग्णांची एकूण आकडेवारी : तीन लाख 93 हजार 614

  • एकूण मृत्यू : चार लाख 41 हजार 749

  • एकूण लसीकरण : 71 कोटी 65 लाख 97 हजार 428 लसीचे डोस 


Vaccination : लसीकरणाचा कार्यक्रम व्यवस्थित सुरु, 'डोअर टू डोअर व्हॅक्सिनेशन'चा आदेश देणार नाही: सर्वोच्च न्यायालय


राज्यातील स्थिती 
राज्यात बुधवारी  4,174 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 65 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी राज्यात 4 हजार 155  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 8 हजार 491  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 09 टक्के आहे.


मुंबईत 353 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 
मुंबईत गेल्या 24 तासात 349 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 530 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,25,247 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात चार रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 3895 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1253 दिवसांवर गेला आहे. 


 



Coronavirus Vaccine : भारताने लसीकरणाचा 70 कोटीचा टप्पा ओलांडला, राज्यातही 6.40 कोटी डोस वितरित