Coronavirus : देशात कोरोनाचे 3805 रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 38 हजारांवर
Coronavirus Cases Today : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात 3805 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत.

Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस घटताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात 3805 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या 24 तासांत 5069 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील सक्रिय रुग्णांची 38 हजारांवर 293 इतकी झाली आहे.
24 तासांच्या कालावधीत सक्रिय रुग्णांच्या संख्येत 1,290 रुग्णांची घट झाली आहे. देशातील एकूण कोरोनाबळींची संख्या आता 5 लाख 28 हजार 655 वर पोहोचली आहे. तर देशातील दैनंदिन कोरोना सकारात्मकता दर 1.29 टक्के आहे.
#COVID19 | India reports 3,805 fresh cases and 5,069 recoveries in the last 24 hours.
— ANI (@ANI) October 1, 2022
Active cases 38,293
Daily positivity rate 1.29% pic.twitter.com/2fzuPwTgln
महाराष्ट्रात शुक्रवारी पाच बाधितांचा मृत्यू
महाराष्ट्रात शुक्रवारी 459 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर पाच कोरोना रूग्णांचा मृत्यू झालाय. दिलासादायक बाब म्हणजे आज नव्या रूग्णांपेक्षा कोरोनातून बऱ्या झालेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. आज 538 जण कोरोनातून बरे होऊन घरी परते आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यात 538 रूग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत कोरोनातून मुक्त होणाऱ्यांची संख्या 79 लाख 69 हजार 878 वर पोहोचली आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होण्याचा दर 98.13 टक्के झाला आहे.
केरळमध्ये सर्वाधिक 13 कोरोना रुग्णांचा मृत्यू
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात एका दिवसात 3805 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. यासाह भारतातील आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 4 कोटी 45 लाख 91 हजार 112 इतकी झाली आहे. सध्या देशात 38 हजार 293 कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत. गेल्या 24 तासांत 26 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील एकूण कोरोना मृतांची संख्या 5 लाख 28 हजार 655 वर पोहोचली आहे. यामध्ये सर्वाधित मृत्यू केरळमधील आहेत. केरळमध्ये 13 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामागोमाग महाराष्ट्रात पाच कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या























