Coronavirus Cases Today : 24 तासांत देशात 10 हजार 853 नवे रुग्ण, 526 जणांचा मृत्यू
Coronavirus Cases Today: मागील 24 तासांत देशात दहा हजार 853 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 526 जणांचा मृत्यू झालाय.
Coronavirus Cases Today : देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव अद्याप ओसरलेला नाही. काही ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात दहा हजार 853 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 526 जणांचा मृत्यू झालाय. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची देशातील संख्या चार लाख 60 हजार 791 इतकी झाली आहे.
उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट -
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात 12 हजार 432 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या एक लाख 44 हजार 845 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत तीन कोटी 37 लाख 49 हजार 900 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
लसीकरण 108 कोटींच्या पार –
कोरोनावर मात करण्यासाठी देशात वेगानं लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. 24 तासांत देशभरात 28 लाख 40 हजार 174 लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यामुळे देशात 108 कोटी 21 लाख 66 हजार 365 जणांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या डोसची संख्या आहे.
COVID19 | India reports 10,853 new cases and 12,432 recoveries in the last 24 hours; Active caseload stands at 1,44,845; lowest in 260 days: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/dgK5f95127
— ANI (@ANI) November 7, 2021
राज्यातील स्थिती काय आहे?
राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्या आता आटोक्यात येत असल्याचं दिसून येत आहे. आरोग्य मंत्रालयांने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात राज्यात 661 रुग्णांची नोंद झाली आहेत तर केवळ 10 जणांचा मृत्यू झाला आहे. आजची आकडेवारी ही गेल्या काही महिन्यातील सर्वात कमी आकडेवारी आहे. गेल्या 24 तासात राज्यामध्ये एकूण 896 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून सध्या 14 हजार 714 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. राज्यातील कोरोना मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 97.6 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यात 1,48,880 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 968 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6,31, 75, 053 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत.