एक्स्प्लोर

Global Hunger Index 2020 I केंद्र सरकार त्यांच्या काही खास मित्रांचे खिसे भरण्यात व्यस्त : राहुल गांधीं

भारत 107 देशांच्या यादीत 94 व्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत स्थानात सुधारणा पण शेजारी राष्ट्रांच्या तुलनेत सुमार कामगिरी

नवी दिल्ली: ग्लोबल हंगर इंडेक्स अर्थात जागतिक भूक निर्देशांकच्या ताज्या अहवालानुसार भारताची कामगिरी शेजारील राष्ट्रांच्या तुलनेत सुमार असल्याचे दिसून आलं आहे. 107 देशांच्या यादीत भारताचा 94 वा क्रमांक आहे. यावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाना साधला आहे. राहुल गांधीनी केंद्र सरकारवर त्यांच्या काही खास मित्रांचे खिसे भरल्याचा आरोप केला आहे.

राहुल गांधींनी त्यांच्या एका ट्विटमध्ये लिहलंय की, "भारत उपाशी आहे कारण केंद्र सरकार त्यांच्या काही खास मित्रांचे खिसे भरण्यात व्यस्त आहे."

गेल्या वर्षीच्या तुलनेत सुधार ग्लोबल हंगर इंडेक्स 2020 या नावाने प्रकाशित झालेल्या या अहवालात भारत 107 देशांच्या यादीत 94 व्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी 117 देशांच्या यादीत भारताचा 102 वा क्रमांक होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताची रँकिंग सुधारली आहे. पण या वर्षी यादीतील देशांच्या संख्येतही घट झालीय. या आधी भारत 2015 साली भारत 93 वा, 2016 साली 97 वा, 2017 साली 100 वा, 2018 साली 103 व्या क्रमांकावर होता.

ग्लोबल हंगर इंडेक्स 2020 च्या अहवालानुसार, 27.2 गुण असलेल्य़ा भारतात उपासमारीची समस्या ही 'गंभीर' आहे. या अहवालानुसार भारताची 14% लोकसंख्या कुपोषणाची बळी आहे. याआधी 2019 सालच्या अहवालावरूनही राहुल गांधींनी सरकारवर टीकेची झोड उडवली होती.

भारताची शेजारील देशांपेक्षा वाईट कामगिरी

या अहवालानुसार मागील वर्षाच्या तुलनेत भारताचे स्थान जरी सुधारले असले तरी शेजारील देश नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान, म्यानमार, बांग्लादेश, इंडोनेशिया हे देश भारताच्या पुढे आहेत. या देशांची कामगिरी भारतापेक्षा चांगली असल्याचं म्हंटलं आहे. रवांडा, नायजेरिया, अफगानिस्तान, लिबिया, मोझांबिक यासारखे फक्त 13 देशच भारताच्या मागे आहेत.

भारतात उपासमारीची समस्या गंभीर भारतात उपासमारीचे संकट हे मोठं गंभीर असल्याचं म्हंटलं आहे. विशेषत: लहान मुलांच्या कुपोषणाचे प्रमाण खूप भयानक आहे. ग्‍लोबल हंगर इंडेक्‍स तयार करताना पाच वर्षाच्या आतील बालकांच्या कुपोषणाचे प्रमाण आणि त्यांचा मृत्यू हे मुद्दे लक्षात घेतले जातात.

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget