एक्स्प्लोर

भारत इतिहास घडवणार! अंतराळात स्वतःचं स्पेस स्टेशन बनवण्याच्या तयारीत

भारत आता 'गगन'भरारी घेण्यासाठी सज्ज होत आहे. जगभरात सध्या अमेरिका, रशिया आणि चीन या तीनच देशांकडे स्वतःचे स्पेस स्टेशन आहे. येणाऱ्या काही वर्षांमध्ये भारतही या देशांशी बरोबरी करणार आहे.

नवी दिल्ली : भारत अंतराळात स्वतःचे स्पेस स्टेशन (Space Station) बनवण्याच्या तयारीत आहे. भारताच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात महत्त्वकांक्षी प्रकल्प असणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) प्रमुख के. सिवन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. भारताने हा प्रकल्प 2030 पर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास 20 टन इतके वजन असलेल्या या स्पेस स्टेशनमध्ये भारत मायक्रोग्रॅव्हिटीशी संबंधित प्रयोग करु शकणार आहे. या स्पेस स्टेशनमुळे भारतातील अंतराळ प्रवासी 15 ते 20 दिवस अंतराळात राहू शकतात. मिशन गगनयाननंतर या स्पेस स्टेशनबाबतची अधिक माहिती देण्यात येईल असेही इस्रोने आज स्पष्ट केले. दरम्यान, इस्रोकडून सांगण्यात आले आहे की, "हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भारत इतर कोणत्याही देशाची मदत घेणार नाही. सध्याच्या घडीला केवळ अमेरिका, रशिया आणि चीन या तीनच देशांकडे स्वतःचे स्पेस स्टेशन आहे. जगभरातील उर्वरीत सर्व देश अंतराळातील संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन केंद्राचा वापर करतात. भारताचे स्पेस स्टेशन हा मिशन गगनयानचाच एक भाग आहे." व्हिडीओ पाहा के. सिवन यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सिवन यांनी सांगितले की, "ह्यूमन स्पेस मिशन लॉन्च केल्यानंतर आम्ही गगनयान प्रकल्प हाती घेणार आहोत. त्यासोबतच भारत अंतराळात स्वतःचे स्पेस स्टेशन उभारणार आहे." केंद्र सरकारने यापूर्वीच मिशन गगनयानसाठी 10 हजार कोटी रुपयांचे बजेट जारी केले आहे. 2022 मध्ये भारत मानवासह एक यान आंतराळात पाठवणार आहे. त्यापूर्वी भारत दोन मानवरहित यान आंतराळात पाठवण्याचे प्रयोग करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
EC Freeze TMC Name, Symbol : मोठी बातमी, निवडणूक आयोगानं तृणमूल काँग्रेसचे नाव आणि चिन्ह गोठवलं, दोन्ही गटांना दिले महत्त्वाचे आदेश 
मोठी बातमी, निवडणूक आयोगानं तृणमूल काँग्रेसचे नाव आणि चिन्ह गोठवलं, दोन्ही गटांना दिले महत्त्वाचे आदेश 
UPI  पेमेंट शुल्काबाबत मोठा निर्णय! दरवर्षी सरकारला किती हजार कोटींचा फायदा मिळणार? आकडेवारी समोर
UPI  पेमेंट शुल्काबाबत मोठा निर्णय! दरवर्षी सरकारला किती हजार कोटींचा फायदा मिळणार? आकडेवारी समोर
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड

व्हिडीओ

Amravati Doctor : गोऱ्या रंगाचा सोस, जीवघेणा ओव्हरडोस Special Report
Nadi Jod Project : तहान मराठवाड्याची, प्रतीक्षा नदीजोडची Special Report
Uddhav Thackeray On Marathwada Drought : मराठवाड्यात दृष्काळ; आरोपांचा 'सुकाळ' | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Andolan : उपोषण सुटलं नेमकं काय घडलं? | ABP Majha Special Report
Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
IND vs AFG : संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पावर प्ले मध्ये केली आहे आजवर कुणाला न जमणारी कामगिरी
संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पॉवरप्लेमध्ये विक्रमी कामगिरी
Abhishek Sharma: अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
N Chandrasekaran: अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
Embed widget