India Pakistan War: पाकिस्तानचे एक नव्हे 2-2 पायलट पकडले?, भारताचा धमाका सुरुच
India Pakistan War: भारताने राजस्थानमध्ये पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडलं असून पाकिस्तानच्या एफ 16 या लढाऊ विमानाच्या पायलटला ताब्यात घेतलं आहे.

India Pakistan Drone Attack: ऑपरेशन सिंदूरने बिथरलेल्या पाकिस्तानचे भारतातील जम्मूसह पठाणकोट, जैसलमेर व होशियारपूरमध्ये ड्रोन हल्ले परतवून लावत भारताने प्रतिहल्ला करण्यास सुरुवात केली असून भारताने पाकिस्तानचे एक नव्हे तर 2 पायलट पकडल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानच्या लाहोर, सियालकोट, कराची, इस्लामाबादमध्ये भारताचे हवाई हल्ले सुरुच असून पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे. भारताने राजस्थानमध्ये पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडलं असून पाकिस्तानच्या एफ 16 या लढाऊ विमानाच्या पायलटला ताब्यात घेतलं आहे. (Ind vs Pak)
पाकिस्तानच्या दोन पायलटला पकडलं?
जैसलमेरवरून लढाऊ विमानातून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानी हवाई दलाच्या एका वैमानिकाला भारतीय सुरक्षा दलांनी ताब्यात घेतलं. वैमानिकाची ओळख उघड करण्यात आली नसून त्याची चौकशी सुरु असल्याचं वृत्त आहे. दरम्यान, पाकिस्तानचा आणखी एक पायलट यात असल्याचं सांगितलं जात आहे. दुसऱ्या पायलटबाबत पुष्टी होऊ शकली नाही. मात्र,पाकिस्तानच्या आयएसपिआरने पडले असे मान्य केले तर चित्र स्पष्ट होणार असल्याचं सांगण्यात येतंय. मिळालेल्या माहितीनुसार, एका वैमानिकाला राजस्थानच्या जैसलमेरमधून पडकण्यात आले असून दुसऱ्या पायलटला जम्मू आणि काश्मीरच्या अखनूरमधून पकडले असल्याची माहिती समोर आलीय.
भारताचा धमाका सुरुच
दरम्यान, पाकिस्तानने क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केल्यानंतर भारताच्या s-400 हवाई संरक्षण यंत्रणेंने 30 हून अधिक पाकिस्तानी क्षेपणास्त्रे पाडली आहे. पाकिस्तानचे जेएफ 17 आणि एएफ 16 ही लढाऊ विमानेही पाडण्यात आली आहेत. राजस्थानमधील जैसलमेरमध्ये 30 हून अधिक क्षेपणास्त्रे पाडण्यात आली आहेत. माजी केंद्रीय मंत्री आणि जैसलमेरचे खासदार कैलाश चौधरी यांनी याबाबतचा दावा केला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जैसलमेरच्या लोकांनी सुरक्षित आणि सतर्क राहिले पाहिजे. 30 हून अधिक क्षेपणास्त्रे पाडण्यात आली आहेत. शत्रूकडून जोरदार गोळीबार आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचे वृत्त आहे.
पाकिस्तानचा हवाई हल्ला परतावून लावल्यानंतर भारतीय वायूदलाच्या विमानांनी आता पाकिस्तानातील प्रमुख शहरांवर हल्ला चढवला आहे. पाकिस्तानमधील लाहोर, इस्लामाबाद, बहावलपूर या शहरांवर भारतीय सैन्याने हवाई हल्ले चढवले आहेत. सध्या इस्लामाबादमध्ये एकापाठोपाठ स्फोटाचे आवाज सुरु आहेत.























