India Pakistan War: काश्मीरमध्ये पुन्हा पाकिस्तानी ड्रोन शिरले, भारतीय सैन्याने हवेतच उडवले? आकाशात लाल प्रकाश अन् स्फोट
India Pakistan Ceasefire Violations: भारत आणि पाकिस्तान यांच्यात 10 मे रोजी संध्याकाळपासून शस्त्रसंधी लागू झाली होती. पाकिस्तानने एकही गोळी चालवल्यास त्याला गोळ्याने उत्तर देण्याचे आदेश

India Pakistan War: भारताशी शस्त्रसंधीचा प्रस्ताव मान्य केलेल्या पाकिस्तानच्या सीमारेषेवरील कुरापती अजूनही सुरुच आहेत. सोमवारी रात्री काही पाकिस्तानी ड्रोन्स काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये घिरट्या घालताना दिसून आले. भारतीय सैन्याच्या एअर डिफेन्स सिस्टीमने (Air Defence System) तात्काळ हे ड्रोन (Drone Attack) हवेतच नष्ट केले. त्यामुळे सांबा सेक्टरमध्ये पुन्हा एकदा ब्लॅकआऊट पाहायला मिळाला. यावेळी पाकिस्तानी ड्रोन्स उद्ध्वस्त करताना आकाशात लाल रंगाच्या पट्ट्या आणि त्यापाठोपाठ स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे वृत्त समोर आले होते. परंतु, त्यानंतर भारतीय सैन्याने कोणतेही पाकिस्तानी (Pakistan) ड्रोन्स शिरले नसल्याची माहिती दिली. तसेच शस्त्रसंधी कायम असल्याचे सांगितले. परंतु, सांबा सेक्टरमध्ये आकाशातील लाल पट्टे आणि स्फोटांच्या आवाजांमुळे याठिकाणी नक्की काय घडले, याबाबत अद्यापही संभ्रम आहे. प्राथमिक माहितीनुसार, सुरुवातीला ड्रोन्स दिसल्यानंतर आणि ते नष्ट झाल्यानंतर पुढे काहीही घडले नाही.
यानंतर मंगळवारी सकाळपर्यंत सांबा सेक्टरमधील परिस्थिती सामान्य होती. रात्रभरात याठिकाणी कोणताही गोळीबार किंवा क्षेपणास्त्रांचा हल्ला झाला नाही. परंतु, शस्त्रसंधी करार होऊनही पाकिस्तानने भारतीय हद्दीत पुन्हा एकदा ड्रोन्स धाडण्याची आगळीक केली असेल तर आता केंद्र सरकार आणि भारतीय सैन्य पुढे काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
#UPDATE: After the first wave of drone activity and Air Defence fire. Now, No drone activity observed for the past 15 minutes in Samba. https://t.co/wsJnadZGvx
— ANI (@ANI) May 12, 2025
Comparatively, a very small number of drones have come in the Samba sector. They are being engaged and there is nothing to be alarmed: Army Sources pic.twitter.com/MIEW2b8bNy
— ANI (@ANI) May 12, 2025
Comparatively, a very small number of drones have come in the Samba sector. They are being engaged and there is nothing to be alarmed: Army Sources pic.twitter.com/MIEW2b8bNy
— ANI (@ANI) May 12, 2025
Comparatively, a very small number of drones have come in the Samba sector. They are being engaged and there is nothing to be alarmed: Army Sources pic.twitter.com/MIEW2b8bNy
— ANI (@ANI) May 12, 2025
भारत आणि पाकिस्तानी लष्कराच्या डीजीएमओ दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये मंगळवारी संध्याकाळी चर्चा झाली होती. यावेळी पाकिस्तानने आम्ही शस्त्रसंधीचे उल्लंघन करणार नाही, असे आश्वासन दिले होते. परंतु, पुढील काही तासांमध्येच म्हणजे रात्रीच्या सुमारास सांबा, जालंधर सेक्टरमध्ये पाकिस्तानी ड्रोन्स घिरट्या घालताना आढळून आले. याशिवाय, कठुआ आणि अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानी ड्रोन्स दिसून आल्याची चर्चा होती. मात्र, नंतर हे ड्रोन्स गायब झाल्याचे सांगितले. तर दुसरीकडे काल रात्री अमृतसर हवाई तळावरील वाहतूकही बंद करण्यात आली होती. अमृतसर आणि होशियारपूर या जिल्ह्यांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून ब्लॅकआऊट लागू करण्यात आला होता. तसेच जालंधर परिसरातही वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. या सगळ्या गोष्टी अचानक का झाल्या, याबाबत ठोस माहिती नाही. मात्र, आता भारतीय लष्कर, केंद्र सरकार किंवा परराष्ट्र मंत्रालय यासंदर्भात कोणती माहिती देणार का, हे पाहावे लागेल.
आणखी वाचा























