India Pakistan War: परराष्ट्रमंत्री एस. जयशंकरांच्या सुरक्षेसाठी खास बुलेटप्रुफ गाडी, गोळी आत शिरणार नाही, टायर पंक्चर झालं तरी 50 किलोमीटर धावणार
India Pakistan ceasefire: भारत आणि पाकिस्तान युद्ध , ऑपरेशन सिंदूरवेळी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ते आता शत्रूच्या रडारवर आले आहेत.

Operation Sindoor: भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली असली तरी दोन्ही देशांमधील तणाव अजूनही कायम आहे. दोन्ही देशांमधील राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर शाब्दिक वार केले जात आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरु असताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर इतर देशांशी सातत्याने संवाद ठेवण्याची महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन या सगळ्या राष्ट्रांशी संवाद साधून त्यांना भारताच्या बाजूने वळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. त्यामुळे आता भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर एस. जयशंकर हे प्रकाशझोतात आले आहेत. पाकिस्तानच्या डोळ्यांत सलत असणाऱ्या व्यक्तींपैकी ते एक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
एस. जयशंकर यांच्या ताफ्यात आता बुलेटफ्रुप गाडीचा समावेश करण्यात आला आहे. या गाडीच्या काचा अत्यंत जाड आणि लॅमिनेटेड असतात. त्यामुळे कोणीही गोळीबार केल्यास बंदुकीची गोळी काच भेदून आत येऊ शकत नाही. तसेच गोळीबारात या गाडीचे टायर पंक्चर झाले तरी ही गाडी 50 किलोमीटर अंतर पार करु शकते. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ही बुलेटप्रुफ गाडी तयार करण्यात आली आहे.
India Attack on Pakistan: भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानचे 11 सैनिक ठार
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला होता. यामध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. यामध्ये सीमारेषेपासून 100 किलोमीटर अंतर आत असलेले जैश-ए-मोहम्मद संघटनेचे मुख्यालयही नष्ट करण्यात आले होते. यामध्ये तब्बल 100 दहशतवादी ठार झाले होते. यामध्ये मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा सूत्रधार मसूद अजहर याचे अनेक नातेवाईक मारले गेले होते. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानी लष्कराने भारतीय सैन्याच्या लष्करी तळांवर हवाई हल्ला चढवला होता. हे सर्व हल्ले भारताच्या एअर डिफेन्सने परतवून लावले होते. यानंतर भारतीय सैन्याने केलेल्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानमधील महत्त्वाची ठिकाणे आणि हवाई तळ लक्ष्य करण्यात आले होते. यामध्ये पाकिस्तानच्या महत्त्वाच्या हवाई तळांचे मोठे नुकसान झाले होते. तर 11 पाकिस्तानी सैनिक भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये ठार झाले होते.
आणखी वाचा























