दाऊद इब्राहिम पकडण्याची मोठी संधी, पाकिस्तानशिवाय इतर कोणत्या देशांमध्ये लपू शकतो दाऊद?
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या (India Pakistan War) पार्श्वभूमीवर मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim ) पाकिस्तानातून पळून गेल्याची माहिती आहे.

India Pakistan War : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या (India Pakistan War) पार्श्वभूमीवर, मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim ) पाकिस्तानातून पळून गेल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो पाकिस्तानातील कराची येथे आश्रय घेत होता. ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान हादरला आहे. मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना आश्रय देत पाकिस्तान सहारा देत आहे. अशा परिस्थितीत, भारताकडे दाऊद इब्राहिमला आणि त्याच्यासोबत असणाऱ्या दहशतवाद्यांना पकडण्याची मोठी संधी आहे. जोपर्यंत सीमा संघर्ष थांबत नाही तोपर्यंत दाऊद इब्राहिम त्याचे राहण्याचे स्थान बदल करु शकतो.
पाकिस्तानात येण्यापूर्वी दाऊद इब्राहिमचे निवासस्थान दुबई होते
पाकिस्तानात (Pakistan) येण्यापूर्वी दाऊद इब्राहिमचे निवासस्थान दुबई होते. 1986 मध्ये, तो पहिल्यांदा भारत सोडून दुबईला पळून गेला. आता, भारतीय कायद्यानुसार, तो जवळजवळ 32 वर्षांपासून फरार आहे आणि दुबईनंतर तो पाकिस्तानात लपून बसला आहे. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दाऊद इब्राहिम हा मुख्य आरोपी आहे. तो भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्येही सहभागी होता. सुरुवातीच्या काळात तो दुबईत राहत होता, पण नंतर तो त्याच्या कुटुंबासह पाकिस्तानात आला आणि लपून बसला.
दाऊद कोणत्या देशांमध्ये लपू शकतो?
दुबई आणि पाकिस्तान व्यतिरिक्त दाऊद लंडन, ब्राझील, फिलीपिन्स, हाँगकाँग आणि जर्मनीसारख्या सुरक्षित देशांमध्ये लपू शकतात. गुन्हेगारांसाठी सर्वात सुरक्षित ठिकाणे लंडन आणि ब्रिटन आहेत. लंडनमधील पोलिस आणि न्यायव्यवस्था विश्वासार्ह मानली जाते. अशा परिस्थितीत, हे गुन्हेगार अशा देशांचा शोध घेतात जिथे त्यांच्या अटकेचा धोका जवळजवळ नसतो. कारण त्यांच्या व्यवस्थांमध्ये कायदेशीर गुंतागुंत आहे ज्यामुळे गुन्हेगार सुरक्षित राहतात.
दुबई आणि युएई देखील गुन्हेगारांसाठी सुरक्षीत ठिकाणं मानली जातात
गुन्हे केल्यानंतर भारतातून पळून जाणारे गुन्हेगार बहुतेकदा पाकिस्तान, नेपाळ, दुबई, कॅनडा आणि युएई सारख्या देशांमध्ये आश्रय घेतात. काही देशांसोबत भारताचा प्रत्यार्पण करार कमकुवत आहे, त्यामुळे त्यांना तेथून परत आणणे कठीण होते. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या लोकांसाठी पाकिस्तान हा एक उत्तम लपण्याचा पर्याय आहे. याशिवाय दुबई आणि युएई हे देखील भारतीय गुन्हेगारांसाठी सुरक्षित मानले जातात. त्यांची कायदेशीर व्यवस्था आणि प्रत्यार्पण प्रक्रिया भारताच्या तुलनेत कमकुवत आहे.
महत्वाच्या बातम्या:























