लातूर: आयएएस टीना दाबी (Tina Dabi) यांच्या घरात आनंद पसरला आहे, कारण IAS दाम्पत्य प्रदीप गवांडे (Pradeep Gawande) आणि टीना दाबी यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. टीना दाबी आई झाल्या आहेत, जयपूर येथील रुग्णालयात टीना दाबी यांनी मुलाला जन्म दिला. टीना दाबी 2022 साली जैसलमेरच्या कलेक्टर बनल्या होत्या आणि त्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून त्या मॅटर्निटी लिव्हवर होत्या.
आयएएस दाम्पत्याला पुत्ररत्नाची प्राप्ती
आयएएस दाम्पत्याला पुत्ररत्नाची प्राप्ती झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच त्यांच्या हितचिंतकांनी आणि कुटुंबीयांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे. टीना दाबी यांचा 22 एप्रिल 2022 रोजी आयएएस अधिकारी प्रदीप गावंडे यांच्यासोबत विवाह झाला. आयएएस अतहर आमिर खानसोबत (IAS Athar Amir Khan) घटस्फोट झाल्यानंतर टीना दुसऱ्यांदा बोहल्यावर चढल्या. यानंर टीना बऱ्याच चर्चेत आल्या होत्या. आता लग्नानंतर दीड वर्षांनी या आयएएस दाम्पत्याला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे.
गोड बातमीमुळे कुंटुंबीय आनंदी
टीना दाबी जैसलमेरची कलेक्टर म्हणून काम करत असतानाच तिच्या प्रेग्नन्सीची बातमी समोर आली. प्रेग्नन्सीमुळे टीना डाबी यांनी राज्य सरकारकडे जयपूरमध्ये नॉन फील्ड पोस्टिंगची मागणी केली होती. ती मान्य झाल्यानंतर त्या आधी वैद्यकीय रजेवर, नंतर प्रसूती रजेवर गेल्या. टीना दाबीला मुलगा होईल की मुलगी? याची उत्सुकता त्यांच्या कुटुंबासह सर्वांनाच लागली होती. अशात आता आयएएस दाम्पत्याला मुलगा झाल्याची आनंदी बातमी मिळाली आहे.
लातूरच्या सुनेची जबाबदारी वाढली
प्रदीप गवांडे हे टीना दाबीपेक्षा वयाने 13 वर्षांनी मोठे आहेत. टीना दाबी या यूपीएससी 2016 बॅचच्या टॉपर आहेत, तर प्रदीप गवांडे हे 2013 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. प्रदीप गावंडे हे 41 वर्षांचे असून ते महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात राहणारे आहेत. 29 वर्षीय टीना दाबी या मूळच्या भोपाळच्या आहेत.
पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद ठरला खरा
टीना दाबी यांनी जैसलमेरच्या जिल्हाधिकारी म्हणून त्यांच्या कार्यकाळात पाकिस्तानातून आलेल्या हिंदू स्थलांतरितांचं जैसलमेरमध्ये पुनर्वसन करण्यासाठी खूप काम केलं होतं. विस्थापितांना घरं बांधण्यासाठी भाडेतत्वाने जमीन देण्यापासून त्यांच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्थाही त्यांनी केली होती. तेव्हा एका वृद्ध महिलेने त्यांना पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून आशीर्वाद दिला होता, तो आता खरा ठरत आहे. टीना दाबी यांनी विस्थापित लोकांच्या मुलांसाठी शाळेचीही व्यवस्था केली होती.
हेही वाचा: