Vande Bharat Sleeper Train: देशाच्या विविध भागात धावत असलेल्या वंदे भारत ट्रेनचा (Vande Bharat Express) प्रवास आता आणखी सुखकर होणार आहे. सध्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये फक्त बैठी आसन व्यवस्था आहे, परंतु आता लवकरच या ट्रेनमध्ये स्लीपर कोच देखील येणार आहेत. प्रवाशांना आता आरामदायी प्रवास अनुभवता येणार आहे. याशिवाय वंदे मेट्रो ट्रेनही लवकरच सुरू होणार आहे.
कधीपासून सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन?
आता लवकरच स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आणि वंदे भारत मेट्रो ट्रेन भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये धावणार आहे. यावर बोलताना इंटिग्रल कोच फॅक्टरी महाव्यवस्थापक बीजी मल्ल्या म्हणाले, ते या आर्थिक वर्षातच वंदे भारतची स्लीपर आवृत्ती लाँच करतील. या आर्थिक वर्षात वंदे मेट्रोही सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
स्लीपर कोच बनवून तयार
पुढे मल्ल्या म्हणाले की, नॉन-एसी प्रवाशांसाठी 31 ऑक्टोबर रोजी नॉन-एसी पुश पुल ट्रेन सुरू केली जाईल. यात 22 कोच आणि एक लोकोमोटिव्ह असेल. वंदे भारत स्लीपर ट्रेनचे कोच देखील बनवीन तयार झाले आहेत. त्याचबरोबर मेट्रो ट्रेनचे डबेही तयार केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
स्लीपर ट्रेनमध्ये किती डबे असणार?
वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये एकूण 16 डबे असणार आहेत, ज्यामध्ये 11 डबे 3 टायर कोच, 4 डबे 2 टायर कोच आणि 1 फर्स्ट टायर कोच असतील. ही ट्रेन एक हजार किलोमीटर किंवा त्याहून अधिक अंतरावर धावेल. ही ट्रेन बनवून तयार झाल्याचं महाव्यवस्थापक बीजी मल्ल्या म्हणाले. तर ही स्लीपर कोच ट्रेन 31 मार्च 2024 पूर्वी सुरू होईल, असंही त्यांनी सांगितलं.
किती रंगात येणार वंदे भारत स्लीपर ट्रेन?
सध्या वंदे भारत स्लीपर ट्रेन दोन रंगात सुरू करण्यात आली आहे. आधी पांढऱ्या आणि निळ्या रंगात आणि नंतर केशरी रंगात ती सादर करण्यात येईल. मल्ल्या म्हणाले की, आता वंदे भारत स्लीपर ट्रेन या व्यतिरिक्त कोणत्याही नवीन रंगात आणली जाणार नाही. ही फक्त आहे त्या जुन्या रंगांत सादर केली जाईल.
कधी सुरू होणार वंदे मेट्रो?
वर्षाच्या अखेरीस वंदे मेट्रो ट्रेन देखील सुरू होणार असल्याचं मल्ल्या म्हणाले. जानेवारी आणि फेब्रुवारीदरम्यान वंदे मेट्रो लाँच करण्यात येईल, असंही ते म्हणाले.
हेही वाचा: