IAS Tina Dabi and Pradeep Gawande : राजस्थानचं गेहलोत सरकार सध्या अ‍ॅक्शन मोडमध्ये आलं आहे. राजस्थान सरकारकडून सोमवारी 29 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यानुसार आयएएस टीना दाबी यांची नियुक्ती पहिल्यांदा जिल्हाधिकारी पदी करण्यात आली आहे. आयएएस टीना दाबी (IAS Tina Dabi) आता जैसलमेरच्या नव्या जिल्हाधिकारी असणार आहेत. याआधी त्यांची नियुक्ती सचिवालयामध्ये होती. त्या वित्त विभागामध्ये संयुक्त सचिव पदावर कार्यरत होत्या. आयएएस टीना दाबी आणि त्यांचे पती आयएएस प्रदीप गावंडे यांची दोघांचीही नियुक्ती आधी सचिवालयामध्ये होती.


IAS प्रदीप गावंडे यांचीही बदली
टीना दाबी आता जैसलमेरच्या जिल्हाधिकारी असणार आहेत. तर त्यांचे पती आयएएस प्रदीप गावंडे (IAS Pradeep Gawande) यांचीही बदली करण्यात आली आहे. प्रदीप गावंडे यांची राजस्थान राज्य खाणी आणि खनिज विभाग तसेच उदयपूर पेट्रोलियम संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी त्यांची नियुक्ती संयुक्त शासन सचिव उच्च शिक्षण विभागामध्ये होती. 


'या' आयपीएस अधिकाऱ्याच्या बदल्या
आयपीएस प्रसन्न कुमार खमसेरा यांची नियुक्ती कोटा पोलीस महानिरीक्षक पदी, गौरव श्रीवास्तव यांना भरतपूरचे पोलीस महानिरीक्षक, विकास कुमार पोलिस महानिरीक्षक एटीएस जयपूर, कैलाश चंद विश्नोई अतिरिक्त पोलीस आयुक्त (जयपूर), श्वेता धनकर पोलीस उपायुक्त (जयपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन), प्रीती जैन यांची डायरेक्टर इंटेलिजन्स ट्रेनिंग अकादमी (जयपूर), प्रदीप मोहन शर्मा कमांडंट हादी राणी बटालियन (अजमेर), राजीव प्रचार यांची जयपूरच्या पोलीस आयुक्तपदी, पहलाद सिंह यांची जयपूर वाहतूक पोलीस उपायुक्त, अनिल कुमार यांची पोलीस अधीक्षक प्रतापगड, मृदल कच्छावा यांची पोलीस अधीक्षक झुंझूनू, अमृता दोहून पोलीस उपायुक्त जोधपूर, वंदिता राणा यांची जयपूर शहर पश्चिमच्या पोलीस उपायुक्त, राजकुमार चौधरी कमांडंट बटालियन आरएसी बिकानेर, संजीव नैन यांची पोलीस अधीक्षक दौसा आणि योगेश गोयल यांची पोलीस उपायुक्त जयपूर दक्षिण या पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या