एक्स्प्लोर

Hardeep Singh Nijjar: कॅनडाच्या वक्तव्यावर भारत संतप्त, कॅनडाच्या राजदूताची हकालपट्टी, 5 दिवसांत देश सोडण्याचे आदेश

India-Canada Tensions: भारताने कॅनडाच्या राजदुतांना 5 दिवसांत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. पण का? नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर...

India-Canada Relations: कॅनडानं (Canada) भारतावर खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरची (Hardeep Singh Nijjar) हत्या केल्याचा आरोप केला आणि एका उच्च भारतीय राजदुताला देश सोडण्याचे आदेश दिले. कॅनडाचं कृत्य गांभीर्यानं घेत भारतानंही जशास तसं उत्तर दिलं आहे. कॅनडाच्या राजदुताला देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाकडून एक निवेदन जारी करून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. येत्या 5 दिवसांत कॅनडाच्या राजदुताला भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी मंगळवारी कॅनडाच्या संसदेला संबोधित करताना शीख नेते हरदीप सिंह निज्जर यांच्या हत्येत भारतीय दलालांचा हात असू शकतो, असं वक्तव्य केलं आणि संपूर्ण देशभरात खळबळ माजली. कॅनडाच्या पंतप्रधानांनी थेट भारतावर आरोप केले. एवढंच नाही तर कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही तशीच वक्तव्य केली. यानंतर भारतानं एक निवेदन जारी करून कॅनडाकडून आरोप फेटाळून लावले. कॅनडानं केलेला हत्येचा आरोप अत्यंत हास्यास्पद आणि राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचं भारतानं म्हटलं आहे.

कॅनडाच्या राजदुतांच्या हकालपट्टीवर परराष्ट्र मंत्रालयानं काय म्हटलं? 

कॅनडाच्या वतीनं करण्यात आलेल्या आरोपांनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं एक निवेदन जाहीर करण्यात आलं आहे. परराष्ट्रानं म्हटलं आहे की, कॅनडाच्या भारतातील उच्चायुक्तांना आज पाचारण करण्यात आलं. त्यांना सांगण्यात आलं की, भारतानं नवी दिल्लीत उपस्थित असलेल्या एका वरिष्ठ कॅनेडियन राजदुताला देश सोडण्यास सांगण्याचा निर्णय घेतला आहे. राजदुताला पाच दिवसांत भारत सोडण्यास सांगण्यात आलं आहे. परराष्ट्र मंत्रालयानं पुढे म्हटलं आहे की, "हा निर्णय कॅनडाच्या राजदुताचा आमच्या अंतर्गत बाबींमधील हस्तक्षेप आणि भारतविरोधी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग यावर भारत सरकारची वाढती चिंता प्रतिबिंबित करतो.

हरदीप सिंह निज्जर आहेत तरी कोण? 

हरदीप सिंह निज्जर हे बंदी घातलेल्या फुटीरतावादी गट शीख फॉर जस्टिस (SFJ) शी संबंधित होते. गुरुपतवंत सिंह पन्नू यांच्यानंतर ते या गटाचे दुसरे नेते होते. या वर्षी 18 जून रोजी ब्रिटिश कोलंबियातील गुरुद्वाराबाहेर निज्जर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. निज्जर हा जालंधरच्या भारसिंह पुरा गावचे रहिवाशी होते. 1996 मध्ये ते कॅनडाला गेले, त्यानंतर त्यांनी कॅनडामध्ये प्लंबर म्हणून काम सुरू केलं. मात्र कालांतरानं ते खलिस्तानी कारवायांमध्ये सामील झाले.

निज्जर हे कॅनडाचे नागरिक झाले होते. त्यामुळेच त्यांच्या हत्येनंतर कॅनडातील काही शीख फुटीरतावादी संघटनांनी या हत्येचा तपास करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यास सुरुवात केली. कॅनडाच्या पंतप्रधानांनी निज्जर यांच्या हत्येबाबत संसदेत माहिती दिली. ते म्हणाले की, कॅनडाच्या नागरिकांची त्याच्या भूमीवर हत्या करणं हे सार्वभौमत्वाचं उल्लंघन आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांत कॅनडा हे खलिस्तानी कारवायांचं केंद्र बनलं आहे. अनेक खलिस्तानी दहशतवादी येथे लपले आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  15  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Embed widget