एक्स्प्लोर

Coronavirus | देशात 24 तासात 8392 नवे रुग्ण, कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत जगात भारत सातव्या स्थानी

कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत जगात भारत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. मागील 24 तासात कोरोनाची लागण झालेल्या 8392 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. भारतात 1 मार्च ते 1 जून या चार महिन्यांच्या कालावधीत कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा कसा वाढत गेला हे जाणून घेऊया

नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीत वेगाने वाढ होत आहे. रुग्णसंख्येच्या बाबतीत जगात भारत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आता या महामारीमुळे बाधित रुग्णांची संख्या जवळपास दोन लाख झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आतापर्यंत 1 लाख 90 हजार 535 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

आतापर्यंत 91 हजार 819 जण कोरोनामुक्त झाले आहे. म्हणजेच देशाचा रिकव्हरी रेट 48.19 टक्के इतका आहे. सध्या कोरोनाची लागण असलेले 93 हजार 322 आहे. देशातील मृतांचा आकडा 5394 एवढा आहे. मागील 24 तासात कोरोनाची लागण झालेल्या 8392 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 230 जणांचा मृत्यू झाला आहे.

भारतात कोरोना रुग्णांची संख्या कशी वाढत गेली?

1 मार्च : फक्त 3 कोरोनोबाधित होते 1 एप्रिल : 1 हजार 636 1 मे : 35 हजार 043 1 जून : 1 लाख 90 हजार 535

- म्हणजे 1 मे ते 1 जून या काळात कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 55 हजार 492 ने वाढली.

- कोरोनाबाधितांचा आकडा 22 मे पासून 28 मे पर्यंत दररोज 6 हजारांपेक्षा जास्त वाढला

- 29 आणि 30 मे या दोन दिवशी 7 हजारांपेक्षा जास्त वाढ झाली

- तर काल 31 मे आणि आज 1 जून हा आकडा 8 हजारांनी वाढला आहे.

- 17 मे रोजी 90 हजार कोरोनाबाधित होते म्हणजे साधारण गेल्या पंधरा दिवसात कोरोनाबाधितांच्या संख्येत 1 लाखांची वाढ झाली आहे.

भारतात कोरोना बळींचा आकडा कसा वाढत गेला?

1 मार्च : एकही बळी गेलेला नव्हता 1 एप्रिल : 38 बळी 1 मे : मृतांची संख्या पोहोचली 1 हजार 147 वर 1 जून : 5 हजार 394 - म्हणजे 1 मे ते 1 जून या काळात कोरोनाने 4 हजार 247 बळी घेतले.

- त्यातही शेवटचे 1 हजार बळी 5 दिवसात गेले आहेत

- 14 मे रोजी अडीच हजार मृत होते

- 22 मे रोजी साडे तीन हजार

- 28 मे रोजी साडे चार हजार

- तर आज एक जून साडे पाच हजार + बळी कोविडने घेतले आहेत.

(स्त्रोत - WHO आकडेवारी)

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित महाराष्ट्रात काल 2 हजार 487 कोरोनाबाधितांची वाढ झाली, तर 1 हजार 248 रुग्ण बरे झाले. दिवसभरात सर्वाधिक 89 लोक मृत्यूमुखी पडले आहे. आता कोरोनाग्रस्तांचा आकडा 67 हजार 655 झाला आहे. त्यातील 29 हजार 329 बरे झाले असून महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 43.35 टक्के आहे. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 36 हजार 031 आहे. तर मृतांचा आकडा 2286 आहे. केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित मुंबईत आहे. मुंबईत 39 हजार 686 कोरोनाबाधित असून त्यातील 1279 जणांचा बळी गेला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Bankipur bypoll 2026 Results: भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sant Nivruttinath Maharaj Palkhi : परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Ketan Agrawal Crime Case: सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आता आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
Bankipur bypoll 2026 Results: भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Embed widget