एक्स्प्लोर

Coronavirus Cases : सलग दुसऱ्या दिवशी देशात 40 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद, 546 रुग्णांचा मृत्यू

Coronavirus Cases : देशात सलग दुसऱ्या दिवशी 40 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद, 546 रुग्णांचा मृत्यू आतापर्यंत 3 कोटी 13 लाख 32 हजार रुग्णांना कोरोनाची लागण, तर यापैकी 4 लाख 20 हजार लोकांचा मृत्यू

Coronavirus Cases Today : देशात सलग दुसऱ्या दिवशी 40 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 39,097 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 546 कोरोनाबाधितांनी जीव गमावला आहे. यापूर्वी शुक्रवारी 35,342 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तसेच गेल्या 24 तासांत 35,087 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 
 
देशातील सध्याची कोरोना स्थिती : 

देशात कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या चार लाखांहून अधिक झाली आहे. एकूण 4 लाख 8 हजार रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत तीन कोटी 13 लाख 32 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 20 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 5 लाख 3 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

42 कोटींहून अधिक लसींचे डोस देण्यात आले 

आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 23 जुलैपर्यंत देशभरात 42 कोटी 78 लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 42 लाख 67 हजार लसींचे डोस देण्यात आले आहेत. आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 45 कोटी 45 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 16.31 लाख कोरोना सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. ज्यांचा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्क्यांहून कमी आहे. 

देशात कोरोनाचा मृत्यूदर 1.34 टक्के आहे. तर रिकव्हरी रेट 97 टक्क्यांहून अधिक आहे. तर सक्रिय रुग्णसंख्या 1.30 टक्के आहे. कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत जगभरात भारत सातव्या स्थानी आहे. एकूण बाधितांच्या संख्येत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत. 

राज्यात काल (शुक्रवारी) 6,753 कोरोना बाधित रुग्णांची नोंद 

राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ  लागली आहे. काल 6,753  नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 979 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 22 हजार 485 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.33 टक्के आहे. 

राज्यात काल 167 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.09 टक्के झाला आहे. तब्बल 28 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या  94 हजार 769 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जालना (20), हिंगोली (52), यवतमाळ (14), गोंदिया (58), गडचिरोली (91) या पाच जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 809 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

परभणी  जिल्ह्यात काल शून्य रुग्ण आढळले आहेत. तर साताऱ्यात सर्वाधिक 817 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4, 64,46, 360 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,51, 810 (13.46 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,52,702 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,653व्यक्ती संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत गेल्या 24 तासांत 374 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 374 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 582 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,09,198 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 5,779 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1209 दिवसांवर गेला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget