India Corona Vaccination : संपूर्ण जगभरात दहशत निर्माण करणाऱ्या कोरोनाची (Covid-19) लढाई सुरूच आहे. हा लढा अधिक बळकट करण्यासाठी लसीकरण मोहीम जोरात राबविण्यात येत आहे. या संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी फार महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की, भारतातील 75 टक्के प्रौढ व्यक्तींना लसीकरणाचे दोन्ही डोस मिळाले आहेत.


केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिलेल्या माहितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आनंद व्यक्त करत ट्वीट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी जनतेचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, "75 टक्के प्रौढ लोकसंख्येला संपूर्ण लसीकरण झाले आहे. या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल सर्व देशवासीयांचे अभिनंदन". तसेच ते पुढे म्हणाले की, "आमची लसीकरण मोहीम यशस्वी करणाऱ्या सर्वांचा मला अभिमान आहे."


 






कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपण अधिक बळकट होत आहोत - आरोग्यमंत्री


आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशातील एकूण लसीकरणांची संख्या 1,65,70,60,692 वर पोहोचली आहे. यावर आनंद व्यक्त करताना आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्वीट केले की, "सबका साथ, सबका प्रयास' या मंत्राने, भारताने आपल्या 75 टक्के प्रौढ लोकसंख्येला लसीचे दोन्ही डोस देण्याचे ध्येय गाठले आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपण अधिक बळकट होत आहोत. आपण सर्व नियमांचे पालन केले पाहिजे आणि लवकरात लवकर लस घ्यावी."


 






गेल्या 24 तासांत 893 जणांचा मृत्यू 


गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 2 लाख 34 हजार 281 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर, 893 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 3,52,784 रूग्ण बरे झाले आहेत. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 18,84,937 झाली आहे. 


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha