Sanjay Raut On UP Goa Election 2022 : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज संवाद साधला. शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यामुळं खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.  खासदार संजय राऊत म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये आमच्या सात उमेदवारांचे नामांकन अर्ज बेकायदेशीरपणे रद्द केले. कागदपत्र योग्य दिली तरी सत्तेचा दुरूपयोग केला आहे. आमच्याकडे पुरावे आहेतय ते तीनच्या आधी तिथे पोहोचले होते, तरी देखील त्यांचे नामांकन रद्द केलं. जिल्हाधिकारी ऐकत नाहीत, दबावात काम करत आहेत, ते शिवसेनेला घाबरले आहेत, असं राऊत म्हणाले. हे लोकशाही नाही. आम्ही याबद्दल आवाज उठवणार आहोत, असंही राऊत म्हणाले. 


संजय राऊत म्हणाले की, यासंदर्भात मी दिल्लीत जाणार आहे, निवडणूक आयोगाकडे आम्ही ही मागणी करणार आहोत. निवडणुका फेअर व्हायला हव्यात, त्यांना भीती आहे. नव हिंदूत्ववादी उत्तर प्रदेशात निवडणुक लढतोय. गुड्डू पंडीत यांचाही अर्ज रद्द केला. अशाच प्रकारच्या चुका दाखवत अर्ज केलेल्यांचे अर्ज स्विकारले गेलेत. गोव्यात प्रमोद सावंत यांच्याबाबतीतही तेच झालं. कुणाला तरी आमची भीती वाटतेय. आमचे अर्ज रद्द करण्यात आलेत, असं राऊत म्हणाले. 


राऊत म्हणाले की, गृहमंत्र्यांनी गृहमंत्र्यांची भाषा बोलायला हवी. कायद्याचं राज्य नाही तर तुमची जबाबदारी आहे.  शिवसेनेला उत्तर प्रदेशात पाय ठेवू द्यायचा नाही. ऐकलं नाही तर निवडणूक अधिकारी त्यांनी त्यांच्या अधिकारांचा बेकायदेशीर वापर केलाय. ही भीतीच आहे. हा 'अंधा कानून' आहे, असं राऊतांनी म्हटलं आहे. 


राऊत म्हणाले की, आज भाजपच्या राज्यात शेतकऱ्यांना काय मिळतंय, नोकरदारांना काय मिळतं, जीएसटीचे राज्याचे पैसे परत द्या. राजकारणात लोकांना विसरण्याची सवय असते.  


खरा मर्द असता तर गांधींवर गोळी झाडली नसती
महात्मा गांधींचा भिनिकेवर आम्हीही टिका केली पण स्वातंत्र लढ्यात त्यांचं कार्य , बलाढ्य ब्रिटीश सरकारला आव्हान देण्याचं काम गांधींनी केलं.  पण गांधींचं नेतृत्व असामान्य आहे. गोळी झाडूनही गांधीजी मेले नाहीत. जर तुम्हाला गोळीच झाडायची होती तर ज्यांनी पाकिस्तान बनवला त्यांच्यावर झायाडची होती. खरा मर्द असता तर गांधींवर गोळी झाडली नसती, असं राऊतांनी म्हटलं आहे. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha