Coronavirus Cases Today in India : देशात कोरोनाच्या (Corornavirus) रुग्णांमध्ये घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 2 लाख 34 हजार 281 नवीन रुग्ण आढळले असून 893 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील दैनंदिन सकारात्मकता दर (Positivity Rate) आता 14.50 टक्क्यांवर आला आहे. देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या सध्या 4 कोटी 10 लाख 92 हजार 522 झाली आहे. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे.
सक्रिय प्रकरणांची संख्या 18 लाख 84 हजार 937 इतकी कमी झाली
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 18 लाख 84 हजार 937 वर आली आहे. कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 94 हजार 91 झाली आहे. आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत तीन लाख 52 हजार 784 लोक बरे झाले, त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 87 लाख 13 हजार 494 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.
आतापर्यंत 165 कोटींहून अधिक डोस देण्यात आले
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत (Corona Vaccination) आतापर्यंत 165 कोटींहून अधिक कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस देण्यात आले आहेत. शनिवारी दिवसभरात 62 लाख 22 हजार 682 डोस देण्यात आले. देशभरात आतापर्यंत 165 कोटी 70 लाख 60 हजार 692 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Jammu Kashmir Encounter : जम्मू काश्मीर खोऱ्यात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, गेल्या 12 तासांत जैशचे 5 दहशतवादी ठार
- Health Care : झटपट वजन कमी करायचंय? सब्जाचा करा आहारात समावेश, होतील अनेक फायदे
- Mahatma Gandhi : बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत 'या' अभिनेत्यांनी साकारली गांधीजींची भूमिका
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha