Mumbai Coronavirus Cases : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मुंबईत नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कोरोनामुक्त रुग्णांची संख्या दुप्पट आहे. मुंबईमधील नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवस सातत्याने कमी होत आहे. सध्या ही संख्या एक ते दीड हजारांमध्ये असल्याचे गेल्या काही दिवसांत दिसत आहे. तसेच नव्याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत मुंबई 1 हजार 411 नवे कोरोना (Corona) रुग्ण आढळले आहेत. ज्यामुळे मुंबईत सद्यस्थितीला 12 हजार 187 सक्रिय कोरोनारुग्ण आहेत. मुंबईत शनिवारी 11 जणांच्या मृत्यूची नोंद आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 602 झाली आहे. तर मागील 24 तासांत तब्बल 3 हजार 547 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट वाढून 97 टक्के झाला आहे.
| दिनांक | मुंबईतील रुग्णसंख्या |
| 10 जानेवारी | 13,648 |
| 11 जानेवारी | 11,647 |
| 12 जानेवारी | 16,420 |
| 13 जानेवारी | 13, 702 |
| 14 जानेवारी | 11, 317 |
| 15 जानेवारी | 10, 661 |
| 16 जानेवारी | 7, 895 |
| 17 जानेवारी | 5, 956 |
| 18 जानेवारी | 6, 149 |
| 19 जानेवारी | 6, 032 |
| 20 जानेवारी | 5,708 |
| 21 जानेवारी | 5,008 |
| 22 जानेवारी | 3,568 |
| 23 जानेवारी | 2,250 |
| 24 जानेवारी | 1,857 |
| 25 जानेवारी | 1,815 |
| 26 जानेवारी | 1,858 |
| 27 जानेवारी | 1,384 |
| 28 जानेवारी | 1,312 |
| 29 जानेवारी | 1411 |
सध्या मुंबईतील 13 इमारती सील करण्यात आल्या आहेत. तसंच आज नव्याने सापडलेल्या 1 हजार 411रुग्णांपैकी 187 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोरोना वाढीचा दुप्पटीचा दर 322 दिवस इतका झाला आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट 0.21% इतका झालाय.
धारावीत 39 दिवसानंतर शून्य रुग्णांची नोंदकोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच शुक्रवारी (28 जानेवारी) धारावीत एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नाही. धारावीत 20 डिसेंबर 2021 या दिवशी एकही कोरोनाबाधित रुग्ण आढललेला नव्हता. तिसऱ्या लाटेनंतर धारावीमध्ये एका दिवसात कोरोनाची शून्य प्रकरणे नोंदवण्यास 39 दिवस लागले. दुसऱ्या लाटेदरम्यान 14 जून 2021 रोजी शून्य रुग्णसंख्येची नोंद होण्यासाठी 119 दिवसांचा कालावधी लागला. तर पहिल्या लाटेनंतर 20 डिसेंबर 2020 रोजी धारावीत शून्य रुग्णसंख्येची नोंद झाली होती. यासाठी तब्बल 269 दिवसांचा कालावधी लागला होता. अशी माहिती मुंबई महानगरपालिकेनं दिलीय.