एक्स्प्लोर

India Corona Updates : गेल्या 24 तासांत जगभरातील सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद भारतात, 7766 सक्रिय रुग्ण वाढले

India Coronavirus Updates : गेल्या 24 तासांत 42,909 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तसेच 380 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

India Coronavirus Updates : भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. काल दिवसभरात जगातील सर्व दैशांपैकी सर्वाधिक कोरोनाबाधित भारतात आढळून आले आहेत. सोमवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 42,909 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तसेच 380 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. अशातच गेल्या 24 तासांत 34,763 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

वर्ल्डोमीटर वेबसाईटनं दिलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात भारतात सर्वाधित कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. अमेरकेत 37262, ब्रिटनमध्ये 33196, इराणमध्ये 31516, जपानमध्ये 22748 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, रशिया, मेक्सिको, इराण, इंडोनेशियात भारताहून कमी रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

भारतातील कोरोनाची एकूण आकडेवारी

कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 27 लाख 37 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 38 हजार 210 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 3 कोटी 19 लाख 23 हजार रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या तीन लाखांहून अधिक आहे. एकूण 3 लाख 76 हजार रुग्ण अद्यापही कोरोनावर उपचार घेत आहेत. 

कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 27 लाख 37 हजार 939
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 19 लाख 23 हजार 405
सक्रिय रुग्णांची एकूण आकडेवारी : तीन लाख 76 हजार 324
एकूण मृत्यू : चार लाख 38 हजार 210
एकूण लसीकरण : 63 कोटी 43 लाख 81 हजार लसीचे डोस

महाराष्ट्रात काल (सोमवार) 4,666 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

राज्यात काल (सोमवार) 4,666 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 510 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 63 हजार 416 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के आहे. 

राज्यात काल (सोमवार) 131 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. तब्बल 42 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 52 हजार 844 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13,503 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (48), नंदूरबार (2),  धुळे (20), जालना (33), परभणी (36), हिंगोली (59),  नांदेड (32),  अकोला (23), वाशिम (6),  बुलढाणा (50), यवतमाळ (7), नागपूर (74),  वर्धा (5), भंडारा (8), गोंदिया (4),  गडचिरोली (32) या 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. 

जालना, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया या पाच जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 36,59,613 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,56,939 (12.03 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,91,522 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,315  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

मुंबईत गेल्या 24 तासात 345 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 

मुंबईत गेल्या 24 तासात 345 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 280 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,22,039 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 3036 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1611 दिवसांवर गेला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्काAssembly Election Result 2024 : निकालाआधी सत्तेची जुळवाजुळव सुरु? अपक्षाची भूमिका महत्वाची?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget