नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर दोन्ही देशांच्या सैन्यात झालेल्या हिंसक झडपते भारताच्या 20 जवानांना वीरमरण आलं आहे. यामध्ये कमांडिंग अधिकारी कर्नल संतोष बाबू यांचाही समावेश आहे. चीनच्या हल्ल्याला भारतीय जवानांनी चोख उत्तर दिलं. या हल्ल्यात चीनचे 40 हून अधिक सैनिक मारले गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहीद झालेल्या जवानांचं बलिदान कधीही विसरणार नाही. संपूर्ण देश शहिदांच्या कुटुंबियांसोबत आहे, असं सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं.
शहीद जवानांचा यादी
- बिकूमल्ला संतोष बाबू (कर्नल)
- नुदूराम सोरोन
- मनदीप सिंह
- सतनम सिंह
- के पलानी
- सुनील कुमार
- बिपुल रॉय
- दीपक कुमार
- राजेश ओरंग
- कुंदन कुमार ओझा
- गणेश राम
- चंद्रकांत प्रधान
- अंकुश
- गुरबिंदर
- गुरतेज सिंह
- चंदन कुमार
- कुंदन कुमार
- अमन कुमार
- जयकिशोर सिंह
- गणेश हंसदा
देश जवानांचं बलिदान कधीही विसरणार नाही- राजनाथ सिंह
सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीट करत म्हटलं की, "भारतीय सैनिकांचं वीरमरण दु:खद आणि व्यथित करणारं आहे. आपल्या जवानांनी असामान्य शौर्य़ दाखवलं आणि देशासाठी शहीद झाले. देश जवानांचं शौर्य आणि बलिदान कधीही विसरणार नाही. संपर्ण देश शहीदांच्या कुटुंबियांसोबत आहे."
भारत-चीन वाद नेमका काय आहे?
लडाखमधल्या गैलवान पर्वताजवळच्या प्रदेशात सैन्याच्या जमवाजमवीवरुन हा वाद सुरु झाला. त्याची झळ नंतर लडाखच्या पँगाँग तलावापर्यंत पोहोचली. या तलावाच्या आसपास असलेल्या डोंगररांगामध्ये दोन्ही देशांचे फिंगर एरिया ठरलेले आहेत. पण एकमेकांच्या फिंगर एरियात अतिक्रमण केल्याने वाद पेटला. याआधी भारत-चीनचे 250 जवान एकमेकांसमोर उभे ठाकले, दगडफेक आणि मारामारीत काही जण जखमीही झाले होते.
संबंधित बातम्या
- India-China Face Off | चीनसोबत झालेल्या हिंसक झडपेत 20 भारतीय जवान शहीद
- India-China Face Off | कर्नल संतोष बाबूंसह 20 जवान शहीद; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
- India-China Border Dispute | चीनने LAC ची स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला : पराराष्ट्र मंत्रालय
- IndiavsChina | तब्बल 45 वर्षानंतर भारत चीन सीमेवर रक्त सांडलं, महिनाभरापासून धुमसत्या वादाचा स्फोट
- India-China Face Off | जवानांच्या बलिदानाचं दु:ख शब्दात व्यक्त करु शकत नाही : राहुल गांधी
India-China Dispute | भारत-चीन सैन्य स्तरावरील चर्चा तूर्तास थांबवली : सूत्र