नवी दिल्ली : चीनने सवयीप्रमाणे पुन्हा एकदा भारतासोबत गद्दारी केली आहे. भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात झालेल्या दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्कराने ही माहिती दिली आहे. 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात ही हिंसक झडप झाली होती. सुरुवातीला तीन जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली होती. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार चीनचेही 43 जवान मारले गेलेत किंवा जखमी झाले आहेत.





आज सकाळी भारत -चीन सीमेवरील हिंसक झडपेत कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू, जवान पलानी, कुंदन ओझा यांना वीरमरण आल्याचं समोर आलं होतं. चीनच्या  या हल्ल्यात एकूण 20 जवान जखमी झाले होते. त्यापैकी 3 जवान सुरुवातीला शहीद झाले होते, मात्र आता लष्कराने दिलेल्या माहितीनुसार भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत.





नेमका काय वाद आहे?



लडाखमधल्या गैलवान पर्वताजवळच्या प्रदेशात सैन्याच्या जमवाजमवीवरुन हा वाद सुरु झाला. त्याची झळ नंतर लडाखच्या पँगाँग तलावापर्यंत पोहचली. या तलावाच्या आसपास असलेल्या डोंगररांगामध्ये दोन्ही देशांचे फिंगर एरिया ठरलेले आहेत. पण एकमेकांच्या फिंगर एरियात अतिक्रमण केल्यानं वाद पेटला. याआधी भारत-चीनचे 250 जवान एकमेकांसमोर उभे ठाकले, दगडफेक आणि मारामारीत काही जण जखमीही झाले होते.

India-China Border Tension गलवान खोऱ्यात 20 भारतीय जवानांना वीरमरण, भारताच्या प्रत्युत्तरात चीनचे 43 सैनिक मारले गेल्याची माहिती