एक्स्प्लोर

Cyber Attack: बॉर्डरनंतर आता तुमच्या इंटरनेटवर हल्ला करण्याच्या तयारीत चीन, भारताकडून SOP जारी 

India China Clash: चीनमधून भारतावर सातत्याने सायबर हल्ले होत असल्याने त्यासंबंधी केंद्र सरकारने SOP जारी केलं आहे. 

मुंबई: चीनच्या सैन्याने 9 डिसेंबर रोजी अरुणाचलच्या (Arunachal Pradesh) तवांग प्रदेशात (Tawang Sector) घुसखोरीचा प्रयत्न केल्यानंतर तो भारतीय लष्कराने हाणून पाडला. आता त्यापुढे जाऊन चीन भारताचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. पण आता सीमेवर नव्हे तर इंटरनेटवर चीन युद्धसदृष्य स्थिती तयार करण्याच्या तयारीत आहे. भारतातील इंटरनेटवर सायबर हल्ला करुन इंटरनेट व्यवस्था ठप्प करण्याचा प्रयत्न चीनी हॅकर्सकडून करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सर्व विभागांना निर्देश देऊन स्टॅन्डर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल (Standard Operating Protocol- SOP) जारी केला आहे. 

चीनने आता सीमेसोबतच सायबर वॉरची तयारी केली आहे. काही दिवसांपूर्वी एम्सचे सर्वर हॅक करण्यात आलं होतं. त्यामधून भारतीयांचा डेटा मोठ्या प्रमाणात चोरीला गेला होता. यामागे चीनी हॅकर्स असल्याचं नंतर उघडकीस आलं होतं. आताही चीन तशाच प्रकारची कृती करण्याच्या तयारीत आहे. 

चीनकडून असलेला सायबर धोका लक्षात घेता केंद्र सरकारने सर्व मंत्रालयांना आणि सार्वजनिक कंपन्यांना स्टॅन्डर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल (Standard Operating Protocol- SOP) जारी केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं यामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.  

Standard Operating Protocol- SOP: काय आहे स्टॅन्डर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल?

एखाद्या व्यक्तीला त्याने त्याचं काम कशा पद्धतीने केलं पाहिजे, काम करताना काय प्रक्रिया फॉलो केली पाहिजे याची माहिती म्हणजे स्टॅन्डर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल होय. भारतातील इंटरनेट डेटावर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यानंतर आता केंद्र सरकारने इंटरनेटच्या वापरासाठी स्टॅन्डर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल जारी केला आहे. त्यामध्ये इंटरनेटचा वापर करताना काय प्रक्रिया फॉलो केली पाहिजे याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं आहे. आयटी कायद्यांतर्गत सर्व नियमांचे पालन करणे, वापर झाल्यानंतर कम्प्युटर बंद करणे, ईमेल साईन इन-आऊट करणे, वेळोवेळी पासवर्ड बदलणे यासह अनेक नियमांचे पालन करणे या गोष्टींचे मार्गदर्शन करण्यात आलं आहे. 

Rajnath Singh On India China Clash: भारताचा एकही सैन्य जखमी नाही 

अरुणाचल प्रदेमधील तवांग सेक्टरमध्ये  9 डिसेंबर रोजी चिनी सैन्याच्या घुसखोरीचा डाव भारतीय जवानांनी उधळून लावला. जवळपास 300 ते 400 चिनी सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न केला होता. यामध्ये एकही भारतीय सैनिक जखमी झाला नसल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेत दिली. चीनकडून घुसखोरीचा प्रयत्न केला, त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले असं ते म्हणाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Sarva Pitri Amavasya 2024 : 2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDeepak Sawant Meet Govinda :  माजी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंतांकडून गोविंदाची विचारपूसCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM : 1 ऑक्टोबर 2024 :  ABP MajhaMVA Seat Sharing : महाविकास आघाडी याच आठवड्यात जागावाटप पूर्ण करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Sarva Pitri Amavasya 2024 : 2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
ऐश्वर्याला झालाय 'हा' आजार, सारखं वाढतंय वजन? सोशल मीडियावर दावा, नेटकरी म्हणाले,
दुर्धर आजारानं ग्रस्त ऐश्वर्या, सारखं वाढतंय वजन? नेटकरी म्हणाले, "अच्छा, म्हणूनच अभिषेकसोबत घटस्फोट..."
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, वेळोवेळी धनलाभाचे संकेत
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, अपार धनलाभाचे संकेत
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Embed widget