Indian Bangladesh Train : भारत आणि बांगलादेश दरम्यान धावली तिसरी ट्रेन, मिताली एक्सप्रेसला हिरवा झेंडा!
Indian Bangladesh Train : मिताली एक्सप्रेस आठवड्यातून फक्त दोन दिवस धावणार आहे. भारतातून ही ट्रेन शनिवार आणि रविवारी धावेल तर बांगलादेशातून ही ट्रेन सोमवार आणि गुरुवारी धावेल.
Indian Bangladesh Train : भारताचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Rail Minister Ashvin Vaishnav) आणि बांगलादेशचे रेल्वे मंत्री नुरुल इस्लाम सुजन (Bangladesh Railway Minister) यांनी मिताली एक्सप्रेसला (Mitali Express) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला. भारतातील न्यू जलपाईगुडी रेल्वे स्थानक आणि बांगलादेशातील ढाका कॅन्टोन्मेंट (Dhaka Cant Railway Station) रेल्वे स्थानकादरम्यानची ही पहिली ट्रेन आहे. मात्र, भारत आणि बांगलादेशदरम्यानची (India Bangladesh) ही तिसरी ट्रेन आहे.
भारत आणि बांगलादेश दरम्यान तिसरी ट्रेन, मिताली एक्सप्रेसला हिरवा झेंडा
मिताली एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविण्याच्या कार्यक्रमादरम्यान, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, भारत आणि बांगलादेश हे समान वारसा असलेले देश आहेत, दोन्ही देशांचे वर्तमान आणि भविष्य सामायिक आहे. त्यामुळेच दोन्ही देश एकत्रितपणे वेगाने विकसित होत आहेत.
मिताली एक्सप्रेस कोणत्या दिवशी धावणार?
मिताली एक्सप्रेस आठवड्यातून फक्त दोन दिवस धावणार आहे. भारतातून ही ट्रेन शनिवार आणि रविवारी धावेल तर बांगलादेशातून ही ट्रेन सोमवार आणि गुरुवारी धावेल. ही ट्रेन पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडी ते बांगलादेशातील ढाका कॅन्टोन्मेंट दरम्यानचे सुमारे 513 किमीचे अंतर सुमारे नऊ तासांत कापेल.
मिताली एक्सप्रेसची वेळ
मिताली एक्स्प्रेस (13132) सकाळी 11.45 वाजता न्यू जलपाईगुडीहून सुटेल आणि रात्री 10.30 वाजता ढाका कॅन्टोन्मेंट स्टेशनला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात ही ट्रेन (13131) ढाका कॅन्टोन्मेंट स्टेशनपासून रात्री 10.50 वाजता निघेल आणि सकाळी 7.15 वाजता न्यू जलपाईगुडी रेल्वे स्थानकावर पोहोचेल.
तिकिटाची किंमत
मिताली एक्स्प्रेसमध्ये चार एसी स्लीपर कोच आणि चार एसी चेअर कार बसवण्यात आल्या आहेत. एसी स्लीपरचे तिकीट 4905 रुपये आहे, तर एसी केबिन चेअर कारचे तिकीट 3805 रुपये ठेवण्यात आले आहे. एसी चेअर कारचे सर्वात कमी तिकीट 2707 रू आहे. मिताली एक्सप्रेस ही भारत आणि बांगलादेश दरम्यानची तिसरी ट्रेन आहे. यापूर्वी मैत्री एक्सप्रेस कोलकाता ते ढाका दरम्यान धावत होती. याशिवाय कोलकाता ते खुलना अशी बंधन एक्स्प्रेसही धावत आहे. या दोन्ही गाड्या कोविड दरम्यान थांबवण्यात आल्या होत्या, परंतु 29 मे रोजी त्यांना पुन्हा हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
पर्यटन आणि व्यवसायाला मिळणार चालना
मिताली एक्स्प्रेसचा 61 किमीचा प्रवास भारतात आणि उर्वरित प्रवास बांगलादेशमध्ये निश्चित केला जाईल. ही ट्रेन दार्जिलिंग आणि आजूबाजूच्या सुंदर मैदानांमधून जाईल. अशा परिस्थितीत दोन्ही देशांमधील पर्यटन आणि व्यवसाय वाढेल