Independence Day 2025: पहिली नोकरी मिळवणाऱ्यांना 15,000 रुपये देणार; आजपासून योजना लागू, लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींची घोषणा
Independence Day 2025: 79व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी देशातील तरुणांना एक खास भेट दिली आहे. त्यांनी पंतप्रधान विकासित भारत योजनेची घोषणा केली आहे.

Independence Day 2025: आज संपूर्ण देश स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. 79 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी देशातील तरुणांना एक खास भेट दिली आहे. त्यांनी पंतप्रधान विकास भारत योजनेची घोषणा केली आहे. ही योजना 15 ऑगस्ट 2025 पासून लागू केली जात आहे. याअंतर्गत, तरुणांना सरकारकडून दरमहा 15000 रुपये दिले जातील.
#WATCH | Delhi: Prime Minister Narendra Modi says, "My country’s youth, today is 15th August, and on this very day, we are launching a scheme worth Rs 1 lakh crore for the youth of our country. From today, the Pradhan Mantri Viksit Bharat Rojgar Yojana is being implemented...… pic.twitter.com/KKFTHevUi9
— ANI (@ANI) August 15, 2025
खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी करणाऱ्या लोकांना...
देशातील तरुणांसाठी 1 लाख कोटी रुपयांची योजना सुरू केली आहे. ही योजना प्रधानमंत्री विकासित भारत योजनेच्या नावाने सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सुमारे 3.5 कोटी तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. तसेच, खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी करणाऱ्या लोकांना सरकारकडून 15,000 रुपये दिले जातील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या योजनेअंतर्गत तरुणांना नवीन रोजगाराच्या संधी मिळतील. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांसाठी लखपती दीदी योजना सुरू करण्यात आली आहे, जी आज लाखो महिलांना मदत करत आहे.
15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करताना म्हटले की, गरिबी म्हणजे काय? मला माहिती आहे. म्हणूनच, माझा प्रयत्न असा आहे की सरकार फक्त कागदपत्रांपुरते मर्यादित राहू नये. देशातील नागरिकांच्या जीवनात सरकार उपस्थित असले पाहिजे. सरकारने त्यांच्यासाठी सकारात्मकपणे सक्रिय असले पाहिजे. आम्ही या दिशेने सतत प्रयत्न करत आहोत.
दिवाळीनिमित्त नवीन जीएसटी सुधारणा
पंतप्रधानांनी रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी सुरू केलेल्या पीएम स्वानिधी योजनेचाही उल्लेख केला. लाल किल्ल्यावरून बोलताना पंतप्रधान म्हणाले की, दिवाळीनिमित्त आम्ही एक नवीन जीएसटी सुधारणा आणत आहोत. जीएसटी दरांचा आढावा घेतला जाईल, ज्यामुळे लोकांसाठी कर कमी होतील, जे खूप सोपे देखील असेल, या दिवाळीत तुम्हाला खूप मोठी भेट मिळेल. आम्ही एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. आम्ही नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स आणणार आहोत. दिवाळीत ही तुमची भेट ठरेल. सामान्य माणसाचे कर मोठ्या प्रमाणात कमी होतील. यामुळे दैनंदिन वस्तू स्वस्त होतील आणि अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, अशी घोषणा त्यांनी केली आहे.
पंतप्रधान विकसित भारत योजना आजपासून सुरू
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, देशातील तरुणांनो, आज मी तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. आज १५ ऑगस्ट आहे. आजपासूनच माझ्या देशातील तरुणांसाठी 1 लाख कोटी रुपयांची योजना राबवली जात आहे. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना आजपासून सुरू होत आहे. तुमच्यासाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे. या योजनेअंतर्गत, खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना सरकारकडून 15 हजार रुपये दिले जातील, असे त्यांनी यावेळी सांगितले.
आपल्याला सर्व क्षेत्रात आत्मनिर्भर व्हायचंय : पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले की, "मी तरुणांना आवाहन करतो की त्यांनी स्वतःचे प्लॅटफॉर्म तयार करावेत. आपण आत्मनिर्भर व्हायला हवं. सध्या आपण खतांसाठी (फर्टिलायझर) इतरांवर अवलंबून आहोत. चला आपण खतांचा साठा करून ही अवलंबित्वाची गरज संपवू. आगामी काळात ईव्ही बॅटरीचा युग सुरू होईल. आपण त्या बॅटऱ्याही बनवू. आम्हाला आमच्या तरुणांवर पूर्ण विश्वास आहे. गेल्या 11 वर्षांत उद्योजकतेला मोठी चालना मिळाली आहे. आज लाखो स्टार्टअप्स देशाला बळ देत आहेत," असे त्यांनी म्हटले.























