(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Income Tax Notice to Anil Ambani : उद्योजक अनिल अंबानी आयकर विभागाच्या रडारवर; 420 कोटी रुपयांच्या कर चोरीप्रकरणी नोटीस
Income Tax Notice to Anil Ambani : 420 कोटी रुपयांच्या कर चोरीप्रकरणी अनिल अंबानींना नोटीस. स्विस बँकेत बेहिशेबी 814 कोटी रुपये ठेवल्याचा आरोप.
Income Tax Notice to Anil Ambani : उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांनी स्वीस बँकेत ठेवलेल्या बेहिशेबी 814 कोटींच्या संपत्तीवर 420 कोटी रुपयांच्या करचोरीच्या आरोपप्रकरणी आयकर विभागानं नोटीस पाठवली आहे. अनिल अंबानी यांना 31 ऑगस्टपर्यंत नोटिशीला उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे. अनिल अंबानी यांच्यावर ब्लॅक मनी अॅक्टनुसार आयकर खात्यानं ही नोटिस पाठवली आहे. याबाबत अनिल अंबानी यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी (Reliance Group Chairman Anil Ambani) यांच्या अडचणी संपण्याचं नावच घेईनात. आता अनिल अंबानी यांच्यावर कर चोरीचा ठपका ठेवण्यात आला आहे. आयकर विभागाने (Income Tax Department) अनिल अंबानी यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी मागितली आहे. दोन स्विस बँक खात्यांमध्ये (Anil Ambani Swiss Bank Accounts) 814 कोटी रुपयांहून अधिक अघोषित संपत्तीवर 420 कोटी रुपयांच्या करचोरीबाबत आयकर विभागानं ही मागणी केली आहे.
10 वर्षांपर्यंत होऊ शकतो तुरुंगवास
वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, अनिल अंबानी यांनी जाणूनबुजून कर चुकवल्याचा आरोप आयकर विभागानं केला आहे. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, अंबानी यांनी सुविचारित रणनीती अंतर्गत परदेशी बँक खात्यात जमा केलेल्या रकमेबद्दल भारतीय कर अधिकाऱ्यांना माहिती दिली नाही. या संदर्भात ऑगस्टच्या सुरुवातीला अनिल अंबानी यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. विभागाचं म्हणणं आहे की, अनिल अंबानी यांच्यावर काळा पैसा (अनडिस्क्लोज्ड फॉरेन इनकम अँड एसेट्स) इम्पोझिशन ऑफ टॅक्स कायदा 2015 च्या कलम 50 आणि 51 अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते, ज्यामध्ये दंडासह कमाल 10 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे.
आयकर खात्याला कोणती माहिती मिळाली?
बहामास येथील डायमंड ट्रस्ट ही ड्रीमवर्क होल्डिंग्स इंक नावाची कंपनी चालवते. या कंपनीनं स्विस बँकेत खातं उघडलं आहे. या खात्यात 31 डिसेंबर 2017 रोजी 32,095,600 डॉलर जमा झालं. नोटीसनुसार, ट्रस्टला 25,040,422 डॉलरचा प्रारंभिक निधी मिळाला होता. हा निधी अनिल अंबानी यांच्या वैयक्तिक खात्यातून पाठवण्यात आल्याचं आयकर विभागाचं म्हणणं आहे. अंबानी यांनी 2006 मध्ये ट्रस्ट उघडण्यासाठी केवायसी दरम्यान त्यांचा पासपोर्ट दिला होता. या ट्रस्टच्या लाभार्थ्यांमध्ये त्यांच्या कुटुंबीयांचाही समावेश असल्याचं आयकर खात्यानं म्हटलं आहे.
अनिल अंबानी यांना द्यावा लागणार कोट्यवधींचा कर
British Virgin Islands मध्ये जुलै 2010 मध्ये नोंदणीकृत झालेल्या कंपनीने झुरिच येथील बँक ऑफ सायप्रसमध्ये खाते उघडले. अनिल अंबानी हे या कंपनीचे आणि कंपनीच्या निधीचे अंतिम लाभार्थी मालक असल्याचा आरोप आयकर विभागाने केला आहे. या कंपनीला 2012 मध्ये PUSA या बहामामध्ये नोंदणीकृत असलेल्या कंपनीकडून 10 कोटी डॉलरचे मिळाले होते. अनिल अंबानी हे त्याचे लाभार्थी होते. कर अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही स्विस बँक खात्यांमध्ये एकूण 814 कोटी रुपये जमा असून त्यावर 420 कोटी रुपयांचा कर लागू होतो.